रॉजर फेडरर विजयाचे शतक नोंदविण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:25 AM2019-07-10T05:25:29+5:302019-07-10T05:25:39+5:30

लंडन : रॉजर फेडरर बुधवारी विम्बल्डनमध्ये १०० वा विजय नोंदविण्यासह राफेल नदालविरुद्ध आणखी एका उपांत्य लढतीसाठी सज्ज राहण्याच्या प्रयत्नात ...

Roger Federer is excited to register his century | रॉजर फेडरर विजयाचे शतक नोंदविण्यास उत्सुक

रॉजर फेडरर विजयाचे शतक नोंदविण्यास उत्सुक

लंडन : रॉजर फेडरर बुधवारी विम्बल्डनमध्ये १०० वा विजय नोंदविण्यासह राफेल नदालविरुद्ध आणखी एका उपांत्य लढतीसाठी सज्ज राहण्याच्या प्रयत्नात आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ३० वर्षांवरील पाच खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. टेनिस जगतातील दोन सर्वाधिक यशस्वी खेळाडू फेडरर व नदाल कारकिर्दीत ४० व्यांदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास २००८ नंतर प्रथमच येथे हे दोन दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळतील. नदालने २००८ मध्ये फेडररचा अंतिम लढतीत पराभव केला होता. ही लढत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत शानदार अंतिम लढत मानली जाते. आठवेळचा चॅम्पियन फेडररला उपांत्य फेरीसाठी जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान मोडावे लागेल, तर नदाल अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध खेळेल.


उपांत्य फेरीतील विजेत्या खेळाडूला अंतिम लढतीत गत चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. निशिकोरीविरुद्ध फेडररची कामगिरी ७-३ अशी आहे. सातव्या मानांकित निशिकोरीने गेल्या वर्षी एटीपी फायनल्समध्ये फेडररला नमवले होते.
दुसरीकडे नदालची जागतिक क्रमवारीत ६५ व्या स्थानी असलेल्या क्वेरीविरुद्धची कामगिरी ४-१ अशी आहे. क्वेरीने २०१७ मध्ये जागतिक क्रमवारीत तत्कालीन अव्वल खेळाडू अँडी मरेचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती, पण अंतिम चारच्या लढतीत तो मारिन सिलिचविरुद्ध पराभूत झाला होता.


अमेरिकेची दिग्गज सेरेना विलियम्सने उपांत्य फेरी गाठताना आपल्याच देशाच्या एलिसन रिस्केचे कडवे आव्हान ६-४, ४-६, ६-३ असे परतावले. दुसरीकडे रुमानियाच्या सातव्या मानांकीत सिमोना हालेपनेही उपांत्य फेरी गाठताना चीनच्या शुआइ झँग हिच्याविरुद्ध ७-६(७-४), ६-१ अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

Web Title: Roger Federer is excited to register his century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.