लंडन : निर्णायक क्षणी दोन मॅच पॉईट गमावल्याने टेनिस विश्वातील दिग्गज रॉजर फेडररला नवव्या विम्बल्डन जेतेपदापासून वंचित राहावे लागले. ही सुवर्णसंधी गमावल्याचे शल्य त्याला बोचत आहे.अंतिम फेरीत अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने फेडररवर ७-६, १-६, ६-४, १३-१२ अशी सरशी साधली. या पराभवानंतर फेडरर म्हणाला, ‘सरळ सेटमध्ये पराभूत झालो असतो, तर एवढे वाईट वाटले नसते. मात्र आता असे बोलून काय फायदा? मी चांगली संधी गमावली. अशा लढतीत मोक्याच्या क्षणी गुण घेणे सोपे नसते.’फेडररने १०० विम्बल्डन लढती व ३५० ग्रॅण्डस्लॅम लढतींचा टप्पा गाठला. याबद्दल त्याने सांगितले, ‘मी विक्रमांसाठी कधीच खेळत नाही. टेनिसच्या दर्दी प्रेक्षकांसमोर जोकोविचसारख्या शानदार प्रतिस्पर्ध्याला नमवून मला विम्बल्डन स्पर्धा जिंकायची होती. मी कायम जिंकण्याच्या इराद्यानेच खेळत असतो,’ असेही तो म्हणाला.
सुवर्णसंधी गमावल्याचे रॉजर फेडररला शल्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 3:53 AM