रोटरडम : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने नुकताच वयाच्या 36व्या वर्षी तब्बल 20वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावत सर्वांना चकित केले. या अद्भुत कामगिरीने संपूर्ण क्रीडाविश्व स्तब्ध झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नजरा आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याकडे आहेत. फेडररने अग्रस्थान मिळवल्यास तो अशी कामगिरी करणारा तो टेनिसमधला सर्वात वयोवृद्ध पुरूष खेळाडू ठरेल. 36 वर्षीय फेडररला अव्वल स्थान मिळवण्यासाठी रोटरडम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारावी लागेल. त्याआधी त्याला उपांत्यपूर्व फेरीत आपल्याच देशाच्या स्टॅन वावरिंकाचा पराभव करावा लागेल.
यासंदर्भात, फेडरर म्हणाला की, ‘मी पुन्हा त्याच स्थानी पोहोचण्यास उत्सुक आहे; पण यासाठी मला स्टॅनविरुद्ध खेळावे लागेल. हा सामना फायनलपेक्षा कमी नसेल. मी माझ्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’ दरम्यान, स्पर्धेत तिस-या मानांकित अलेक्झँडर ज्वेरेव याने स्पेनच्या डेविड फेरर याचा 6-4, 6-3 ने पराभव करुन दमदार आगेकूच केली.
सध्याची एटीपी रॅंकिंग -1. राफेल नदाल (स्पेन)2. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)3. मारिन सिलिक (क्रोएशिया)4. अलेक्जेंडर ज्वेरेव (जर्मनी)5. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया)6. डोमिनिक थीम (ऑस्ट्रिया)7. डेविड गॉफिन (बेल्जियम)8. जैक सॉक (अमेरिका)9. जुआन मार्टिन डेल पोटरो (अर्जेंटिना)10. पाब्लो कारेर्नो बुस्ता (स्पेन)