महिला टेनिसमध्ये सिमोना हालेप नंबर वन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 05:29 PM2017-10-07T17:29:24+5:302017-10-07T17:29:39+5:30
टेनिसच्या जागतिक क्रमवारीत रुमानियाची सिमोना हालेप नवी नंबर वन ठरली आहे.
वॉशिंग्टन - टेनिसच्या जागतिक क्रमवारीत रुमानियाची सिमोना हालेप नवी नंबर वन ठरली आहे. चिन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना तिने हा टप्पा गाठला आहे. टेनिसमध्ये सर्वोच्च स्थानी पोहचलेली ती रुमानियाची पहिलीच आणि एकूण 25 वी खेळाडू आहे. सोमवार ९ रोजी सिमोनाच्या सर्वोच्च स्थानावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.
ही 26 वर्षीय खेळाडू सर्वोच्च स्थानी स्पेनच्या गर्बाईन मुगुरुझाची जागा घेईल. मुगुरुझा ही फक्त चार आठवडे नंबर वन राहिली. यंदा महिला टेनिस जगताने नंबर वन स्थानी चार खेळाडू पाहिल्या. त्यात सिमोना हालेपच्या आधी मुगुरुझा, जर्मनीची अँजेलिक कर्बर, कॕरोलिना प्लिस्कोवा आणि अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा समावेश आहे.