मेलबर्न : यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीच्या सामन्यांचा 'ड्रॉ' आज काढण्यात आला. मात्र महिला एकेरीची गतविजेती कॅरोलीन वोझ्नियाकी हा ड्रॉ न बघताच निघून गेली. आपले सामने कुणाशी आहेत याची तिला उत्सुकता कशी नाही याचे अनेकांना आश्चर्य वाटले.
याचे कारण तिने सांगितले की खूप वर्षांपूर्वी ती जेंव्हा ज्युनियर गटात खेळायची त्यावेळी तिला सामन्यांचा ड्रॉ बघायची सवय होती पण व्हायचे काय की रोलीन ड्रॉ बघायची आणि लवकरच पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडायची म्हणून पुढे पुढे तिने ड्रॉ बघणेच बंद केले आणि योगायोग म्हणा की आणखी काही, पण ती जिंकायला लागली. त्यामुळे माझ्यासाठी स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे आहे, ड्रॉ नाही असे ती म्हणाली.
आता सर्वच खेळाडू एवढे चांगले आहेत आणि त्यांच्यात फरक एवढा कमी आहे की, कोणत्याही दिवशी कुणीही जिंकू शकतो. त्यामुळे मला सामन्यागणिक प्रतिस्पर्ध्यावर लक्ष देणे महत्त्वाचे वाटते आणि त्यानंतर पुढच्या सामन्यांचा विचार करते असे तिने सांगितले.