मेलबर्न : अमेरिकेची दिग्गज आणि अनुभवी व्हिनस विलियम्स हिला वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम असलेल्या आॅस्ट्रेलिय ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने खळबळ माजली. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंचिचने अनपेक्षित निकाल नोंदवताना दिमाखदार विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष गटामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदाल याने वेगवान खेळाच्या जोरावर सहज विजयी सलामी दिली.गतवर्षी लहान बहिन सेरेना विलियम्सकडून पराभूत झाल्याने व्हिनसला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा पहिल्याच फेरीत व्हिनसला पराभूत झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पहिला सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुस-या सेटमध्ये व्हिनसने चांगली झुंज दिली. परंतु, टायब्रेकमध्ये दबावाखाली आल्यानंतर चुका झाल्याने व्हिनसला बेलिंडाविरुद्ध ३-६, ५-७ अशी हार पत्करावी लागली. बेलिंडा गतवर्षी या स्पर्धेत बलाढ्य सेरेनाविरुद्ध पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती.त्याचबरोबर अमेरिकन ओपन चॅम्पियन स्लोएन स्टीफेन्स, १०व्या स्थानी असलेली कोको वेंडेवेगे आणि सिसि बेलिस या नामांकीत खेळाडूंनाही पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. स्टीफेन्सला चीनच्या झांग शुआइ हिने २-६, ६-७, ६-२ असा धक्का दिला. तसेच, टिमिया बाबोसने जबरदस्त प्रदर्शन करताना कसलेल्या वेंडेवेंगे हिला ७-६, ६-२ असा बाहेरचा रस्ता दाखवला. पुरुषांमध्ये बलाढ्य राफेल नदालने आपल्या लौकिकासह दमदार विजयी सलामी देताना डॉमनिक प्रजासत्ताकच्या व्हिक्टर एस्टेÑल्ला बर्गोस याचा ६-१, ६-१, ६-१ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडला. नदालच्या ताकदवर आणि वेगवान खेळापुढे व्हिक्टरला संपूर्ण सामन्यात केवळ तीन गेम जिंकण्यता यश आले. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव यानेही विजयी सलामी देताना आॅस्ट्रियाच्या डेनिस नोवाक याचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रेड त्सोंगा याने अमेरिकेच्या केविन किंग याचा ६-४, ६-४, ६-१ असा सहज पराभव करत शानदार विजयी सलामी दिली.युकी पुन्हा सलामीलाच गारद...1भारताचा टेनिस स्टार युकी भांबरी पुन्हा एकदा आॅस्टेÑलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. तिसºयांदा या स्पर्धेत खेळत असलेल्या जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानी असलेल्यायुकीला जागतिक क्रमवारीत १०३व्या स्थानीअसलेल्या सायप्रसच्या मार्कोस बगदातिसविरुद्ध६-७, ४-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.2पहिला सेट टायब्रेकपर्यंतनेल्यानंतर थोडक्यात आघाडी मिळवण्याचीसंधी गमावलेल्या युकीला नंतर पुनरागमन करण्यात अपयश आले. २००९ साली या स्पर्धेत ज्यूनिअर गटाचे जेतेपद पटकावलेल्या युकीला २०१५ साली पहिल्या फेरीत अँडी मरेकडून, तर २०१६ साली थॉमस बर्डिचकडून पराभव पत्करावा लागला होता.
दिग्गज व्हिनस विलियम्स पहिल्याच फेरीत पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 2:53 AM