शहरं
Join us  
Trending Stories
1
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
2
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
3
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
4
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
5
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
6
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
8
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
9
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
10
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
11
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
12
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
13
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
14
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
15
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
16
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
17
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
18
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
19
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
20
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न

युकी भांबरीने नोंदवला खळबळजनक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:28 AM

भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील २२ व्या स्थानी असलेल्या गाएल मोंफिल्सला नमवून एटीपी सिटी ओपन स्पर्धेत खळबळ माजवली.

वॉशिंग्टन : भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील २२ व्या स्थानी असलेल्या गाएल मोंफिल्सला नमवून एटीपी सिटी ओपन स्पर्धेत खळबळ माजवली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना युकीने फ्रान्सच्या मोंफिल्सला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, मोंफिल्सने गेल्या वर्षी येथे जेतेपद पटकावले होते.स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या मोंफिल्सविरुद्ध एक तास ५१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत युकीने जबरदस्त खेळ केला. तीन सेटपर्यंतच्या या लढतीमध्ये युकीने ६-३, ४-६, ७-५ अशी शानदार बाजी मारली. याआधीही युकीने २०१४ साली चेन्नई ओपन स्पर्धेत जागतिक टेनिसचे लक्ष वेधताना विश्वक्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या फॅबियो फोगनिनी याला पराभवाचा धक्का दिला होता. परंतु, त्या वेळी इटलीच्या फॅबियोने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला होता. या वेळी मात्र युकीने आपली छाप पाडली. यापुढील फेरीत युकीचा सामना अर्जेंटिनाच्या गुइडो पेलाविरुद्ध होईल. पेलाने पहिल्या फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथनला नमविले होते. यानंतर दुसºया फेरीत त्याने जर्मनीच्या मीशा ज्वेरेवला ६-७, ७-६, ६-३ असा धक्का दिला होता. भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपन्नाने अमेरिकन जोडीदार डोनाल्ड यंगसह खेळताना दुसºया फेरीत प्रवेश केला. बोपन्ना-यंग यांनी डॅनियल नेस्टर (कॅनडा) आणि एसाम उल हक कुरेशी (पाकिस्तान) या जोडीला ६-२, ६-३ असे नमविले. (वृत्तसंस्था)हा अविश्वसनीय विजय आहे. मी प्रत्येक गुण मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि माझी सर्व्हिस कायम राखण्यावर भर दिला. आक्रमक पवित्रा राखून खेळताना मी मिळालेल्या संधीचा फायदा उठवला.- युकी भांबरीएटीपी विश्व टूर स्पर्धेत दुसºयांदा युकीने मुख्य स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली. याआधी त्याने २०१४ साली चेन्नई ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तसेच, २०१५ साली सप्टेंबर महिन्यात युकीने जागतिक क्रमवारीत अव्वल ५० स्थानांमध्ये असलेल्या झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याला हरविले होते.