बंदच्या दिवशी १३०० कर्मचाऱ्यांनी लावली हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:40 PM2018-12-14T23:40:55+5:302018-12-14T23:41:12+5:30

भाजपाप्रणित कामगार संघटनेवर कारवाईची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

1300 employees of the shutdown day | बंदच्या दिवशी १३०० कर्मचाऱ्यांनी लावली हजेरी

बंदच्या दिवशी १३०० कर्मचाऱ्यांनी लावली हजेरी

Next

मीरा रोड : भाजपाप्रणित कामगार संघटनेने मंगळवारी महापालिकेत केलेल्या बंदच्या दिवशी १९०० पैकी तब्बल १३०० कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक यंत्राद्वारे आपली हजेरी लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दबावाखाली कामावर हजर होऊ न देणाºया भाजपा प्रणित कामगार संघटनेवर कारवाई करा अशी तक्रार विरोधी पक्षनेते राजू भोईर यांनी आयुक्तां कडे केली आहे. कर्मचाºयांनी लावलेली हजेरी पाहता तेही बंदच्या विरोधातच होते असे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रभागात भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत पालिकेने अशी कारवाई केल्याने सरनाईक यांनी विभागप्रमुख दादासाहेब खेत्रे यांना खडसावले होते. संतप्त जमावातून शिविगाळ झाली तर दगड मारून पोकलेनची काच तोडली. आमदार नरेंद्र मेहता व ते अध्यक्ष असलेल्या श्रमिक जनरल कामगार संघटनेने खेत्रे यांना मारहाण झाल्याचे सांगत सरनाईकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत मंगळवारी पहाटे परिवहन सेवा भाजपाच्या संघटनेने बंद पाडली. तर पालिका मुख्यालय, प्रभाग समिती आदी सर्व कार्यालयात काम बंद आंदोलन केले. शिवसेनेच्या संघटनेचे अनेक कर्मचारी मात्र कामावर हजर होते. अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरले, पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सत्यकाम फाऊंडेशन, जिद्दी मराठा संस्था आदींनी संपकरी कर्मचाºयांवर कारवाईची लेखी तक्रारच पालिका आयुक्तांपासून सरकारकडे केली आहे. भोईर यांनी भाजपा प्रणित कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर कारवाईची मागणी केली आहे. कामावर येऊ इच्छिणाºया कर्मचाºयांना बळजबरी हजर होऊ दिले नाही. राजकीय दबावाखाली कर्मचाºयांनी मुकाट्याने दडपशाही सहन केली असे भोईर म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील वाद वाढत असून भविष्यात तो वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कामगारांचा मनापासून पाठिंबा नव्हता
मंगळवारी हजेरी लावणाºया कर्मचाºयांची संख्या पाहिली तर स्पष्ट होते की भाजपाच्या बेकायदा व राजकीय स्वार्थाच्या बंदला कर्मचाºयांचा मनापासून पाठिंबाच नव्हता. कारण त्या दिवशी कायम, कंत्राटी व मानधनावरील १९०५ कर्मचाºयांपैकी तब्बल १ हजार २२३ कर्मचाºयांनी हजेरी लावली होती.

त्यातही बायोमेट्रिक मशीन नादुरूस्त असल्याने काही जलकुंभावरील ६१ कर्मचारी तर इंदिरा गांधी रूग्णालयातील ३० कर्मचाºयांची हजेरी नोंद झाली नाही. त्यामुळे हे ९१ कर्मचारी वगळता केवळ ५९१ कर्मचाºयांचीच गैरहजर म्हणून नोंद आहे. त्यामुळे भाजपा प्रणित कामगार संघटनेने केलेल्या बंदमध्ये कर्मचारी नाईलाजाने सहभागी झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे असा दावा भोईर यांनी केला आहे.

Web Title: 1300 employees of the shutdown day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.