शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
4
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
5
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
6
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
7
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
8
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
9
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
10
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
11
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
12
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
13
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
14
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
15
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
16
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
17
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
18
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
19
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
20
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

परिवहनच्या १२ जागासांठी १५ उमेदवार

By admin | Published: April 13, 2016 1:44 AM

ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे.

ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात ठेवल्याने आणि मनसे व रिपाइं यांच्यापैकी कुणाच्या उमेदवाराने माघार घ्यायची, याचा तिढा न सुटल्याने होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही परिवहनच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ काँग्रेसच्या एका सदस्याने आपला अर्ज मागे घेतला तर एक अर्ज सोमवारी छाननीत बाद झाला. ठाणे परिवहन समितीवर १२ सदस्यांच्या निवडीकरिता १७ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युनिस शेख यांचा अर्ज छाननीत बाद झाला असून काँग्रेसचे शैलेश शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता १२ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनकडून पवन कदम, साजन कासाय, अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव, नरेश देसाई आणि संजय भोसले यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून सचिन शिंदे यांचा एकमेव अर्ज आता शिल्लक आहे. तर राष्ट्रवादीकडून सुरेंद्र उपाध्ये, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर, सुधाकर नाईक या चार जणांचे अर्ज दाखल आहेत. मनसे कडून राजेश मोरे आणि रिपाइंकडून उत्तम खडसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे केवळ तीन सदस्य समितीवर जाणार असतानाही त्यांचे चार उमेदवार रिंगणात आहेत. मनसे अथवा रिपाइंचा प्रत्येकी एक सदस्य समितीवर निवडून जाणार आहे. परंतु मनसे अथवा रिपाइंच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीपुढील चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीकडून तकी चेऊलकर, हेमंत धनावडे आणि सुरेंद्र उपाध्यय यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि माजी मंत्री गणेश नाईक गटातील तिघांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरणार आहे. (प्रतिनिधी)संख्याबळानुसार सेनेचे सर्वाधिक सात सदस्य तर राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य निवडून जावू शकतो. दरम्यान मनसे आणि रिपाइं एकतावादी हे ठामपातील लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असल्याने यातील एकाला राष्ट्रवादीने पाठिंबा देणे अपेक्षित होते.दोन अतिरिक्त उमेदवार रिंगणात राहिल्याने कोणाच्या पारड्यात किती मते पडणार यावरुनच परिवहनचे दार कोणाला उघडणार याचे गणित ठरणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजाराला ऊत येणार असून, त्यास सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व रिपाइं हे पक्ष जबाबदार आहेत.