ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ७१८ नवीन रुग्ण कोरोनामुळे बाधित झाले असून ४४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ७३ हजार ९२२ तर मृतांची संख्या दोन हजार ५३ इतकी झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये बुधवारपेक्षा गुरुवारी कमी प्रमाणात म्हणजे ३६६ रुग्ण दाखल झाले. बुधवारी हीच संख्या ४२१ च्या घरात होती. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या १७ हजार ३८९ तर मृतांची २८१ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्येही गुरुवारी ३१७ इतक्या नवीन बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे याठिकाणी बाधितांची १६ हजार ८५९ तर मृतांची ५८६ झाली. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातही ३३० नवीन रुग्णांसह तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. इथे आता बाधितांचा आकडा १२ हजार ५९९, तर मृतांची संख्या ३६५ वर पोहोचली.
मीरा-भार्इंदरमध्ये १७९ रुग्ण नव्याने दाखल झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या सात हजार १२९ तर मृतांची २४४ इतकी झाली. भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात ५८ जण बाधित झाले असून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ३४९ तर मृतांची संख्या १८४ झाली आहे. उल्हासनगरमध्ये १६१ रु ग्णांची आणि पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. याठिकाणी बाधितांची संख्या सहा हजार १७८ तर मृतांची संख्या १०२ वर पोहोचली आहे.
अंबरनाथमध्ये ७६ रु ग्ण दाखल झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ३५५ तर मृतांची संख्या १३२ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ५३ रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या दोन हजार १५४ तर मृतांची संख्या ३५ आहे. ठाणे ग्रामीण भागांत १७८ रु ग्णांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ९१० तर मृतांची संख्या १२४ वर पोहोचली आहे.