ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आणखी १५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १८७ झाली आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, येथील आतापर्यंत सर्वाधिक ३ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या दहावर पोहोचली आहे.
ठाणे पालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट परिसरातील ७२ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित निघाला असून, ते ज्या डॉक्टरकडे गेले होते, त्यांना क्वारंटाइन केले आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भार्इंदर येथे प्रत्येकी ४ रुग्ण आढळले आहेत. भिवंडी येथे रविवारी पहिला रुग्ण आढळला आहे. आता ठामपा-४५, केडीएमसी-५५, नवी मुंबई-३९, मिरा-भार्इंदर-३६, अंबरनाथ-३, कुळगाव-बदलापूर-४, ठाणे ग्रामीण-३, उल्हासनगर आणि भिवंडी प्रत्येकी एक असे एकूण १८७ रुग्ण सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा रु ग्णालयात ४२ जण दाखलकोविड १९ चे विशेष रु ग्णालय म्हणून ठाणे जिल्हा रु ग्णालय जाहीर झाल्यानंतर तेथे संशयित रुग्णांना दाखल केले जाऊ लागले. आतापर्यंत ४२ जणांना दाखल केले असून त्यामध्ये २८ पॉझिटिव्ह आहेत. आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित जणांचा अहवाल येणे बाकी आहे. या रुग्णांपैकी २८ जण ठामपा, वसई-विरार- ८, पालघर- १, भिवंडी-१, केडीएमसी-१, मीरा-भार्इंदर- १, अंबरनाथ- १, ठाणे ग्रामीण- २ आणि उल्हासनगर- १ असे आहेत.पोलीस ठाण्याच्या ३१ जणांना केले क्वारंटाइनशहर पोलीस दलातील एका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानुसार, २५ जणांची तपासणी केली असून त्यांचा अहवाल आलेला नाही. पण, त्याच पोलीस ठाण्याच्या एकूण ३१ जणांना क्वारंटाइन केले आहे. दुसºया एका पोलीस ठाण्याचा एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तो अधिकारी यापूर्वीच क्वारंटाइन होता. त्यामुळे अद्यापही संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.