ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३३१ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 07:26 PM2020-12-26T19:26:20+5:302020-12-26T19:26:32+5:30
Corona News in Thane : ठाणे शहरात ९५ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ५४ हजार ८७८ रुग्णांची नोंद झाले.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३३१ रुग्ण शनिवारी सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४१ हजार ४७३ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ९२४ मृतांची नोंद आहे.
ठाणे शहरात ९५ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ५४ हजार ८७८ रुग्णांची नोंद झाले. तर, दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३०२ झाली. कल्याण - डोंबिवलीत १०० रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता ५७ हजार ६६ बाधीत असून एक हजार ९६ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये ११ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात ११ हजार ३०८ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३५८ झाली आहे. भिवंडी परिसरात एकही रुग्ण व मृत्यू नाही. येथे आता सहा हजार ४२२ बाधितांची तर, ३५१ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदर शहरात ३० रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात २५ हजार २३७ बाधितांस ७८२ मृतांची संख्या आहे.
अंबरनाथ शहरात सात रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार २१४ बाधितांसह मृतांची संख्या ३०० आहे. बदलापूरला १२ रुग्ण आज सापडले असून आठ हजार ७७० बाधीत आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या ११४ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये सहा रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १८ हजार ७०३ बाधीत झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५७८ मृत्यूची नोंद कायम आहे.