- सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी ठिकाणी साफसफाईचा अभाव, ठिकठिकाणी पडलेला कचरा यामुळे हिवताप आणि डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे एका अहवालावरून उघड झाले. वर्षभरात हिवतापाचे १२६ रुग्ण असतानाच डेंग्यूचे सर्वाधिक ४०३ रुग्ण आढळले. यातील सुमारे २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वायरल इन्फेक्शन सतत वाढत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तापाच्या रुग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वाढत आहे. यात थंडीतापासह डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या आढळत आहे. वर्षभरात हिवताप व डेंग्यूचे सुमारे ५२९ संशयित आढळले. डेंग्यूच्या या संशयितांमधील दगावलेल्या २८ जणांपैकी महापालिका क्षेत्रातील १५ रुग्ण असून नगरपालिका क्षेत्रातील सहा, आदिवासी भागातील तीन आणि ग्रामीण भागातील चार रुग्ण दगावल्याची गंभीर बाब निदर्शनात आली आहे. हिवतापापेक्षा वर्षभरात जीवघेण्या डेंग्यूच्या संशयित रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकांसह अन्यही ठिकाणी तो वाढत असल्याचे म्हणणे वावगे नसल्याचे बोलले जात आहे. संशयितांमधून सुमारे ३२ डेंग्यूचे रुग्ण निश्चित करता आले आहेत. यातील सहा रुग्ण दगावल्याची नोंद आहे. तर हिवतापाच्या केवळ तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण, ही हास्यास्पद बाब असली तरी प्रत्यक्षात दगावलेल्या २८ पैकी काही पट रुग्ण वर्षभरात दगावले आहेत. परंतु, त्यास विहीत नमुन्यात नोंदण्याची संधी मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.
४०३ जणांना डेंग्यूची लागण
By admin | Published: February 09, 2016 2:18 AM