मनपासह जिल्ह्यात ८१९३ मुले शाळाबाह्य
By admin | Published: April 15, 2016 01:28 AM2016-04-15T01:28:53+5:302016-04-15T01:28:53+5:30
‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. कोणतेही रेकॉर्ड नसताना त्यांना दाखल केल्याची नोंदही होत आहे.
- सुरेश लोखंडे, ठाणे
‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. कोणतेही रेकॉर्ड नसताना त्यांना दाखल केल्याची नोंदही होत आहे. प्रत्यक्षात मात्र आठ हजार १९३ मुले अद्यापही शाळेत नसल्याचे निदर्शनात आले आहे. यात तीन हजार ७५६ मुलींचा समावेश आहे.
शैक्षणिक वर्ष संपले असून दोन महिन्यांनी नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार आहे. प्रारंभापासून या शाळाबाह्य मुलांना जवळच्या शाळेत गांभीर्याने सामावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु जुलै, आॅगस्ट, डिसेंबर आणि जानेवारीअखेरपर्यंत सर्व्हे केलेली मुले शाळेत दाखल केल्याचे भासवून जबाबदारी पूर्ण केल्याचे शिक्षण विभाग भासवत आहे. प्रत्यक्षात मात्र ही मुले आजपर्यंतही वर्गातच बसली नसल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील या शाळाबाह्य मुलांचा चार वेळा शोध घेण्यात आला. या वेळी सहा महापालिका क्षेत्रांतून सहा हजार ७७५ मुलांची नोंद झाली आहे. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील तालुक्यांच्या गावखेड्यांतील एक हजार ४१८ मुले शाळेत नसल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यात ७१७ मुले आणि ७०१ मुलींचा समावेश आहे. या आठ हजार १९३ मुलांपैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना तर जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.
या सर्वेक्षणातील चार हजार ३८७ मुले शहरी भागातील शाळांमध्ये दाखल झालेले नाहीत. तर, गावखेड्यांतील २१४ मुले शाळेत नाहीत. परंतु, फेब्रुवारीपर्यंत सर्व मुले त्यांच्या जवळच्या शाळांमध्ये दाखल केले आहेत.
मात्र, सवयीप्रमाणे ते शाळेत न बसता उनाडपणा करून गैरहजर राहत असल्याची पळवाट काही शिक्षकांकडून नमूद केली जात आहे. यावरून, ‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याकडे सुयोग्य पद्धतीने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुले
महापालिका मुलेमुली
ठाणे मनपा०७८१०७३८
उल्हासनगर०१७२०१५६
भिवंडी१३३५१००९
कल्याण०३५७०२३३
मीरा-भार्इंदर०३२६०२८५
नवी मुंबई०७४९०६५४
जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील मुले
तालुकामुलेमुली
भिवंडी१९४१९९
कल्याण०८७०९१
मुरबाड०६७०५८
शहापूर०२३४०२२१
अंबरनाथ०१३५०१३२