शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

मनपासह जिल्ह्यात ८१९३ मुले शाळाबाह्य

By admin | Published: April 15, 2016 1:28 AM

‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. कोणतेही रेकॉर्ड नसताना त्यांना दाखल केल्याची नोंदही होत आहे.

- सुरेश लोखंडे,  ठाणे‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. कोणतेही रेकॉर्ड नसताना त्यांना दाखल केल्याची नोंदही होत आहे. प्रत्यक्षात मात्र आठ हजार १९३ मुले अद्यापही शाळेत नसल्याचे निदर्शनात आले आहे. यात तीन हजार ७५६ मुलींचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष संपले असून दोन महिन्यांनी नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार आहे. प्रारंभापासून या शाळाबाह्य मुलांना जवळच्या शाळेत गांभीर्याने सामावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु जुलै, आॅगस्ट, डिसेंबर आणि जानेवारीअखेरपर्यंत सर्व्हे केलेली मुले शाळेत दाखल केल्याचे भासवून जबाबदारी पूर्ण केल्याचे शिक्षण विभाग भासवत आहे. प्रत्यक्षात मात्र ही मुले आजपर्यंतही वर्गातच बसली नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील या शाळाबाह्य मुलांचा चार वेळा शोध घेण्यात आला. या वेळी सहा महापालिका क्षेत्रांतून सहा हजार ७७५ मुलांची नोंद झाली आहे. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील तालुक्यांच्या गावखेड्यांतील एक हजार ४१८ मुले शाळेत नसल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यात ७१७ मुले आणि ७०१ मुलींचा समावेश आहे. या आठ हजार १९३ मुलांपैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना तर जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील चार हजार ३८७ मुले शहरी भागातील शाळांमध्ये दाखल झालेले नाहीत. तर, गावखेड्यांतील २१४ मुले शाळेत नाहीत. परंतु, फेब्रुवारीपर्यंत सर्व मुले त्यांच्या जवळच्या शाळांमध्ये दाखल केले आहेत. मात्र, सवयीप्रमाणे ते शाळेत न बसता उनाडपणा करून गैरहजर राहत असल्याची पळवाट काही शिक्षकांकडून नमूद केली जात आहे. यावरून, ‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याकडे सुयोग्य पद्धतीने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील शाळाबाह्य मुले महापालिका मुलेमुलीठाणे मनपा०७८१०७३८उल्हासनगर०१७२०१५६भिवंडी१३३५१००९कल्याण०३५७०२३३मीरा-भार्इंदर०३२६०२८५नवी मुंबई०७४९०६५४जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील मुलेतालुकामुलेमुलीभिवंडी१९४१९९कल्याण०८७०९१मुरबाड०६७०५८शहापूर०२३४०२२१अंबरनाथ०१३५०१३२