मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ८१ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 05:28 PM2017-08-14T17:28:00+5:302017-08-14T17:28:10+5:30
- राजू काळे
भार्इंदर, दि. १४ - मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुका, २०१७ मध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण ५०९ उमेदवारांपैकी ८१ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून ५७ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे उघड झाले आहे.
यात भारतीय जनता पार्टीच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) (रिपाइं) सह एकूण ९३ पैकी २५ म्हणजेच २७ टक्के उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यापाठोपाठ शिवसेनेच्या ९३ पैकी १८ (२० टक्के), काँग्रेसच्या ७४ पैकी १० (१४ टक्के), राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६३ पैकी ९ (१४ टक्के), बहुजन विकास आघाडीच्या २७ पैकी ३ (११ टक्के), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) २४ पैकी २ (८ टक्के) उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तर खंडणी, अपहरण, चोरी, फसवणूक, धमकावणे, महिलांवर अत्याचार अशा गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ५७ उमेदवार असल्याचे समोर आले आहे. त्यात भारतीय जनता पार्टीच्या ९३ पैकी १८ (१९ टक्के) शिवसेनेच्या ९३ पैकी १३ (१४ टक्के), काँग्रेसच्या ७४ पैकी ५ (७ टक्के), राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६३ पैकी ७ (११ टक्के), बहुजन विकास आघाडीच्या २७ पैकी २ (७ टक्के), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) २४ पैकी २ (८ टक्के) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. विविध प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये भाजपाच्या ज्योत्स्रा हसनाळे, गणेश शेट्टी, पंकज पांडे, प्रशांत केळुस्कर, अॅड. रवी व्यास, परशुराम म्हात्रे, मिलन पाटील, अश्विन कासोदरिया, ध्रुवकिशोर पाटील, मोहन म्हात्रे, वर्षा भानुशाली, हसमुख गेहलोत, विनोद काशिनाथ म्हात्रे, मधुसुदन पुरोहित, सचिन म्हात्रे, अशोक तिवारी, हंसुकमार पांडे, रिटा शाह, अरविंद शेट्टी, दिपिका अरोरा, प्रशांत दळवी, मुन्ना सिंह, चंद्रकांत वैती, दौलत गजरे, मनोज दुबे, शिवसेनेच्या प्रतिभा तांगडे-पाटील, स्टिवन मेंडोन्सा, सॅन्ड्रा रॉड्रीक्स, जयंतीलाल पाटील, प्रभाकर म्हात्रे, सुमन कोठारी, रतन शर्मा, बालेस्टर सिंह, संदिप पाटील, वंदना चक्रे, प्रेमनाथ पाटील, रजनीकांत मयेकर, प्रणाली पाटील, तारा घरत, राजू भोईर, ब्रिसेन सिंह, अनिता पाटील, भगवती शर्मा, राष्ट्रवादीचे योगेश शर्मा, पुजा जैत्पाल, सोमनाथ पवार, जावेद सय्यद, अमीर तासे, रविराज राठोड, साबीर शेख, लार्सन दाल्मेडा, श्रद्धा शेलार, काँग्रेसचे राजवंत सिंग, मुकेश रावल, निता घरत, प्रदिप जंगम, रुबीना शेख, लक्ष्मण मौर्या, रविकांत शेट्टी, शिल्पा भावसार, सुशिलकुमार दुबे, महेश म्हात्रे, मनसेचे प्रमोद देठे, पुतुल अधिकारी, अपक्ष उमेदवार शरद पाटील, मिलन म्हात्रे, भावेश गांधी, सुभाष गौड, ययाती परब, मोहम्मद मुस्ताकिम शेख, विजयकुमार स्वामी, मोहम्मदसाबीर सय्यद, संजीवनी कुंभार, निर्मला पाल, महेंद्रकुमार प्रजापती, पंकज जैन, अमजद शेख, बहुजन विकास आघाडीचे इस्तायक शाह, योगेश पुजारी, मोहसीन शेख, बहुजन समाज पार्टीचे सुधीर कांबळे, तसेच सर्वात श्रीमंतांच्या पहिल्या १० जणांच्या यादीत भाजपा व सेनेच्याच उमेदवारांचा समावेश असुन त्यात शिवसेनेच्या ६ व भाजपाच्या ४ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची मालमत्ता ६७ कोटी ५० लाख ते २४ कोटी दरम्यान दर्शविण्यात आली आहे. एकुण ५०९ उमेदवारांची मालमत्ता सरासरी २ कोटी ४६ लाख रुपये इतकी आहे. मात्र त्यात पहिल्या दहा उमेदवारांच्या यादीत गरीब उमेदवारांचा देखील समावेश आहे. त्यात ४ राष्ट्रवादीचे, १ काँग्रेसचा व ५ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यांची मालमत्ता १ लाख १६ हजार ते १,१०० रुपये दरम्यान दर्शविण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकुण ११ उमेदवार २१ ते २४ वयोगटातील असुन ४१ उमेदवार २५ ते ३० वयोगटातील, १४५ उमेदवार ३१ ते ४० वयोगटातील, २०५ उमेदवार ४१ ते ५० वयोगटातील, ८७ उमेदवार ५१ ते ६० वयोगटातील, १८ उमेदवार ६१ ते ७० वयोगटातील व २ उमेदवार ७१ ते ८० वयोगटातील आहेत. एकुण २८० पुरुष तर २२९ महिला उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत.