तिन्ही मतदारसंघांसाठी ८७ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:31 AM2019-04-10T00:31:22+5:302019-04-10T00:31:24+5:30
आज होणार छाननी : शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ११४ उमेदवारी अर्ज दाखल
ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यासाठी मंगळवार या शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह ८७ जणांनी त्यांची ११४ नामनिर्देशनपत्रे (अर्ज) दाखल केली आहेत. संभाव्य धोके टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या प्राप्त अर्जांची १० एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे.
ठाणे मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३५, कल्याणमध्ये ३६ उमेदवारांनी ५० आणि भिवंडीत २२ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. या तीन मतदारसंघांमध्ये ८७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. यापैकी खरी लढत ठाणे मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना-भाजपाचे राजन विचारे आणि काँग्रेस-राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यात होईल. याप्रमाणेच कल्याणमधून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी काँग्रेस-राष्टÑवादीचे बाबाजी पाटील, तर भिवंडीमधून विद्यमान खासदार भाजपा-शिवसेनेचे कपिल पाटील यांच्याशी काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे सुरेश टावरे यांच्यात होणार आहे.
याप्रमाणेच ठाण्यातील बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रभाकर जाधव,सर्वोदय भारत पार्टीचे बृह्मदेव पांडे, भारत जन आधार पार्टीचे अजय गुप्ता, हिंदुस्थान निर्माण दलचे ओंकारनाथ तिवारी आणि डॉ. अक्षय झोडगे या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. तसेच बहुजन आघाडीतर्फे कोपरखैरणे येथील मल्लिकार्जुन पुजारी, रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय घाटे, तर सुधारक शिंदे, माधवीलता मौर्य या अपक्षांनी उमेदवारी दाखल केली. मंगळवारी रमेश श्रीवास्तव (अपक्ष), सुभाषचंद्र झा (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), हेमंत पाटील (सनातन संस्कृती रक्षा दल), राजेशचंद्र जैस्वार (बसपा), उस्मान शेख (बहुजन महापार्टी), राजेश कांबळे (बहुजन मुक्ती), ओमप्रकाश पाल (अपक्ष) मोहम्मद सलीम चौधरी (अपक्ष), दिलीप अलोनी (अखिल भारतीय जनसंघ), सुरेंद्रकुमार जैन (नैतिक पार्टी), विनोद पोखरकर (अपक्ष), राहुल कांबळे (बहुजन मुक्ती), शुभांगी चव्हाण (अपक्ष), दिगंबर बनसोडे (अपक्ष), दत्तात्रेय सावळे (अपक्ष), विठ्ठल चव्हाण (संभाजी ब्रिगेड), प्रमोद कांबळी (अपक्ष), मुकेश तिवारी (अपक्ष) आदींनी ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे. कल्याण मतदारसंघातून शिवा कृष्णमूर्ती अय्यर, नरेंद्र मोरे, सोनाली गंगावणे, सुरेश पाल, अजय मौर्या, दिनकर पालके, देवेंद्र सिंग, पंकज सप्तीसकर, संजय जाधव, युसुफ खान, यास्मिन सलीम, वसीम सय्यद, अस्मिता पुराणिक, नफीस अन्सारी, विनय दुबे, जोतीराम सरोदे, चंद्रकांत मोटे, सुहास बोंडे, अमरीश मोरजकर, जफरुल्लाह सय्यद, संदेश इंगळे, योगेश्वर रतेश्वर आदी २२ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आकाश पाटील यानेही राष्ट्रवादीचा अर्ज दाखल केला आहे. मुनीर अन्सारी (इंडियन युनियन मुस्लिम लीग), महम्मद खान (बहुजन महापार्टी), वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडावू, बहुजन समाज पार्टीचे रवींद्र केणे यांनी तर मिलिंद कांबळे यांनी भारत जनआधार पार्टीचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. विनोद साळवे (भारतीय किसान पार्टी), संतोष भालेराव (आंबेडकर राइट पार्टी आॅफ इंडिया), हबिबूर खान (पिस पार्टी), हरेश ब्राह्मणे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), गौतम वाघचौरे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. सुरेश गवई (भारत प्रभात पार्टी) यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
भिवंडी लोकसभेचा आखाडा
भिवंडी मतदारसंघातून नितेश जाधव, संजय पाटील (अपक्ष), किशोर किनकर (भारत प्रभात), खासदार पाटील यांचा पुतण्या देवेश पाटील (भाजपा), बाळाराम म्हात्रे (अपक्ष), अरुण सावंत (वंचित बहुजन आघाडी), दीपक खांबेकर (अपक्ष), योगेश कथोरे (अपक्ष), फिरोज शेख (जनअधिकार) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
याशिवाय कपिल पाटील (अपक्ष), नुरूद्दीन अन्सारी (समाजवादी), नुरूद्दीन अन्सारी (हिंदुस्थान शक्ती सेना), सुहास बोंडे (अपक्ष), कपिल धामणे (अपक्ष), संजय वाघ (भारतीय ट्रायबल पक्ष), विश्वनाथ पाटील (अपक्ष), नवीन मोमिन (अपक्ष) आणि सुरेश म्हात्रे (अपक्ष) आदी उमेदवारही भिवंडी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत.