कपिल पाटील फाऊंडेशन तर्फे भिवंडीत भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

By नितीन पंडित | Published: March 3, 2023 07:12 PM2023-03-03T19:12:01+5:302023-03-03T19:13:03+5:30

कपिल पाटील यांच्या शुभहस्ते दिव्यांग तथा अंध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

A grand health check-up camp was concluded in Bhiwandi by Minister Kapil Patil Foundation | कपिल पाटील फाऊंडेशन तर्फे भिवंडीत भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कपिल पाटील फाऊंडेशन तर्फे भिवंडीत भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

googlenewsNext

भिवंडी: भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवारी पद्मा नगर येथे स्थानिक माजी नगरसेवक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आले होते.

भिवंडी शहरातील पद्मानगर येथे आयोजित आरोग्य शिबिरात एस एम बी टी रुग्णालय घोटी ,विमला आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्त तपासणी,हृदय विकार ईसीजी तपासणी,अस्थीरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,नेत्र तपासणी,दंत चिकित्सा,मोफत चष्मे, मोफत औषधे, दिव्यांगासाठी व्हीलचेअर,कमी ऐकू येणाऱ्या नागरीकांना कानातील श्रवण यंत्र,अंधां साठी बोलके घड्याळ कपिल पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.

कपिल पाटील यांच्या शुभहस्ते दिव्यांग तथा अंध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आमदार महेश चौघुले, भाजपाशहराध्यक्ष संतोष शेट्टी,भिवंडी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ,अखिल पद्मशाली समाज, रामकृष्ण पोटाबत्तीनी,भाजपा जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,सिद्धेश पाटील यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. तर दाभाड येथे महिलांचा भव्य मेळाव्याचे आयोजन दुपारी करण्यात आले होते. या मेळाव्यास परिसरातील शेकडो महिला उपस्थित झाल्या होत्या.

Web Title: A grand health check-up camp was concluded in Bhiwandi by Minister Kapil Patil Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.