प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

By धीरज परब | Published: June 14, 2024 05:01 PM2024-06-14T17:01:09+5:302024-06-14T17:02:20+5:30

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले.

a municipal workshop on implementing an effective flood response strategy organized one day workshop in bhayander | प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मीरारोड :  पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवल्यास ती नियंत्रणात आणण्यासह अत्यावश्यक उपाययोजनां बद्दल अधिकारी - कर्मचारी यांना पूर प्रतिसाद धोरण राबविण्या बाबतची कार्यशाळा मीरा भाईंदर महापालिकेने आयोजित केली होती  . 

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात दर पावसाळ्यात वाढत जाणाऱ्या पूरस्थितीने चिंता निर्माण केली असली तरी शहरातील राजकारणी व महापालिका मात्र त्यावर अजूनही गांभीर्याने चिंतन करताना दिसत नाहीत . दरम्यान पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासह तशी स्थिती उद्भवल्यास महापालिका अधीकारी व कर्मचारी यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन व्हावे म्हणून  आयुक्त संजय काटकर यांच्या पुढाकाराने भाईंदरच्या नगरभवन सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . 

मुंबईच्या मे.आगा खान एजेंसी फॉर हबीटेट इंडिया  या संस्थेमार्फत शहरातील वस्ती, नागरिकांची संख्या बहुतांश प्रमाणात वाढत असल्याने शहरात पावसाळा दरम्यान पूरसदृश्य परिस्थिती झाल्यास महापालिका प्रशासनास विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांना मात देऊन पावसाळा दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत शहरात सुव्यवस्था राखण्यात कशाप्रकारे मदत होईल या करिता  मार्गदर्शन करण्यात आले .  आयुक्त काटकर, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त डॉ. सचिन बांगर , शहर अभियंता दिपक खांबित सह कार्यशाळेत सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक वैद्यकीय आरोग्य विभाग , सर्व प्रभाग अधिकारी, परिवहन, उद्यान व वृक्ष प्राधिकरण व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. अतिवृष्टी झाल्यास शहरात पूर परिस्थितीत हाताळण्यास महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्त यांनी नमूद केले. शहरातील पाणी साचण्याच्या सखल भागांची व तेथे बसविण्यात आलेल्या सक्श्न पंपची पाहणी केली गेली आहे . यंदा वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी नाल्यांमध्ये, गटारांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, आपल्या परिसराची स्वच्छता राखून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त  संजय काटकर यांनी केले . 

Web Title: a municipal workshop on implementing an effective flood response strategy organized one day workshop in bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.