डोंबिवलीच्या विद्या निकेतन शाळेत भरले आजी-आजोबा संमेलन; विटीदांडू, संगीत खुर्ची खेळत लुटला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 01:42 PM2018-01-27T13:42:46+5:302018-01-27T13:43:46+5:30
विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळा पाहण्यासाठी आणि काही काळ आनंदात घालवण्यासाठी डोंबिवलीच्या विद्यानिकेतन शाळेत दरवर्षी आजीआजोबा संमेलनाचे आयोजन केले जाते
डोंबिवली - पालकसभा अथवा परीक्षांचा निकाल या केवळ दोन दिवशी विद्यार्थ्यांचे पालक शाळेत हजेरी लावतात. त्यातही आई अथवा वडील उपस्थित राहून आपल्या मुलामुलींच्या विकासाचा आढावा घेत असतात.आजीआजोबा हे आपल्या नातंवाचा संभाळ करत असतात. शाळेत जाताना बस स्टॉपवर सोडत असतात. मात्र त्यांना नातंवंडाच्या शाळेत जाण्याची संधी मिळत नाही. म्हूणन विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळा पाहण्यासाठी आणि काही काळ आनंदात घालवण्यासाठी डोंबिवलीच्या विद्यानिकेतन शाळेत दरवर्षी आजीआजोबा संमेलनाचे आयोजन केले जाते.
डोंबिवलीच्या विद्यानिकेत शाळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आजीआजोबा संमेलनाचे आयोजन केले होते. तब्बल 500 आजी आजोबांनी शाळेच्या आवारात हजेरी लावली. यावेळी आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, नृत्य अशी सांगितीक मैफल ठेवली होती. तर विटीदांडू , संगीत खुर्ची , ब्यालसिंग बीम अशे खेळ सुद्धा ठेवण्यात आले होते.संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या झालेल्याचे अनेक ज्येष्ठांनी सांगितले. संमेलनाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षिकांनी आजींच्या हातावर मेंदी काढली. आजीआजोबा सोबत शाळेतील शिक्षिकांनी सुद्धा या संमेलनाचा आनंद घेतला.