लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:39 PM2019-02-19T22:39:23+5:302019-02-19T22:45:37+5:30

घटस्फोटीत महिलेवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करणा-या निखील ठाकूर (२७) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Accused arrested for sexual harassment in the name of marriage | लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

कासारवडवली पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईगेल्या दोन वर्षांपासून सुरु होता अत्याचार २१ फेब्रुवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या निखील रामचंद्र ठाकूर (२७, रा. हारबू पाडा, ओवळा, घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
२८ वर्षीय पीडित महिलेशी निखीलची २०१७ मध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिचा विश्वास संपादन करुन त्याने २०१७ ते २६ जानेवारी २०१९ या दोन वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ती गरोदर राहिल्यामुळे त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्याही जबरदस्तीने देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर २६ हजारांची रोकड आणि एक तोळ्याची सोनसाखळीही पीडित महिलेकडून त्याने जबरीने चोरली. निखील आणि त्याचा मित्र मितेश भोकरे या दोघांनी मिळून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन सामूहिक बलात्कार करण्याचीही धमकी दिली. तिचे कपडे फाडून तिचा विनयभंगही केला. या प्रकाराला त्रासून तिने १६ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर ठाकूर याला पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार भोकरे याचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक एस. एच. चौगुले या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Accused arrested for sexual harassment in the name of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.