मीरारोड - धुलीवंदनच्या निमीत्ताने ठाणे ग्रामीण वाहतुक पोलीस व स्थानिक पोलीसांनी मीरा भाईंदर मध्ये केलेल्या संयुक्त कारवाईत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाराया २४५ जणांवर कारवाई केली गेली. तर मद्यपान करुन वाहन चालवणाराया ६ चालकांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली आहेत. पोलीसांच्या धडक मोहिमे मुळे नियम मोडणाराया वाहन चालकांसह सोबतच्या प्रवाशांचा चांगलाच बेरंग झाला.वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव सह वाहतुक व स्थानिक पोलीसांनी आज मंगळवारी मॅक्सस मॉल चौकी जवळ तपासणी चालवली होती. दुचाकी वर दोन पेक्षा जास्त सवार असणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे या सह आवश्यक कागदपत्रे - परवाना नसणे आदी प्रकरणी कारवाई केली गेली.
पोलीसांना मद्यपान करुन वाहन चालवणारे ६ जण आढळुन आल्याने त्यांच्यावर कारवाई करत वाहनं पोलीसांनी ताब्यात घेतली. २४५ जणांवर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करतानाच त्यांच्या कडुन दंड वसुल केला गेला. सायंकाळी ७ नंतर पोलीसांनी पुन्हा तपासणी नाका लाऊन कार्यवाही सुरु केली होती. त्याची आकडेवारी मात्र उशीरा पर्यंत कळु शकली नाही.