ठाणे : दिव्याच्या खाडी परिसरातील गावठी दारूच्या अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने बुधवारी दिवसभर धाडसत्र राबवले. या धाडीत दारूनिर्मितीसाठी लागणा-या २२ हजार ८०० लीटर रसायनासह पाच लाख नऊ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फरारी झालेल्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या पथकाने २७ डिसेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दिवा पूर्व भागातील खाडीकिना-याच्या परिसरातील खर्डी पुलाजवळील गावठी दारूनिर्मितीच्या अड्ड्यावर दुपारी १२ ते २.३० वाजण्याच्या सुमारास हे धाडसत्र राबवले. या धाडीत रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे ११४ प्लास्टिकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे १९ रिकामे ड्रम असा सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीची कुणकुण लागताच अड्डाचालकांनी मात्र पलायन केले.
उत्पादन शुल्कची दिव्यातील हातभट्टीवर कारवाई : रसायनासह पाच लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 8:05 PM
खाडी परिसरात मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दिवसभर दिव्यात धाडसत्र राबवून २२ हजार ८०० लीटर रसायन जप्त करुन नष्ट केले.
ठळक मुद्दे खर्डी ते आगासनदरम्यान खाडीकिनारी धाडसत्र२२ हजार ८०० लीटर रसायन जप्त धाडीच्या दरम्यान अड्डा चालकांचे पलायन