उल्हासनगर : पठाणी व्याजाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या रुबिना अन्सारी या महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने, पठाणी व्याजखोराची घटना उघड झाली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
उल्हासनगरात गिरीश चुग यांनी लोकल ट्रेन खाली आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. व्हिडिओ मध्ये पठाणी व्याजखोरावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकारने पठाणी व्याजखोरां विरोधात संताप निर्माण झाली असताना, दुसऱ्याच आठवड्यात कॅम्प नं-१ येथील रुबिना अन्सारी या महिलेने पठाणी व्याज खोरातून आत्महत्त्या प्रवृत्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकारने एकच खळबळ उडाली. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी दोन महिन्यानंतर तिघांना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
रुबिना अन्सारी या महिलेने २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र ४ वर्षात २० हजाराचे ४ लाख व्याज भरूनही लाखो रुपये बाकी असल्याचे सांगून केली होती कोंडी. त्यातूनच आत्महत्या करण्याचा प्रयत्न अन्सारी यांनी केली होती. गेल्या आठवढ्यात कॅम्प नं-५ परिसरातील सुनील मोटवानी नावाचा इसम बेपत्ता झाल्याचा गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. बेपत्ता झालेल्या मोटवानी यांनी पठाणी व्याजातून हे पाऊल उचलल्याचे लिहिलेल्या चिट्टीत नमूद केले. मोटवानी याच्या जीवाला धोका असल्याची भीती कुटुंबानी व्यक्त करून शोध घेण्याची मागणी पोलिसांना केली. गिरीश चुग यांच्या आत्महत्या प्रकरणीही कल्याण रेल्वे पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही. तसेच बेपत्ता मोटवानी यांचा शोध घेण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.