बदलापूर : कुळगाव बदलापूर पालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवरील सर्व बेकायदा शेड तोडण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र शेड तोडण्याच्या कारवाई दरम्यान पालिकेने शहरातील जुन्या दुकानांवर कारवाई केली आहे. विकास आराखड्यातील रस्त्याच्या पलिकडे असलेल्या दुकानांवरही पालिकेने कारवाई केली आहे. या जुन्या दुकानांवर कारवाई करताना पालिकेने संबंधित दुकानदारांना नोटीसही बजावली नाही. त्यामुळे पालिकेची कारवाई ही वादात सापडली आहे.
पालिकेच्या धडक कारवाईचे दोन दिवसांपासून स्वागत होत होते. मात्र आता या कारवाईबाबत संताप व्यक्त होत आहे.पालिकेच्या वतीने कारवाई सुरू असताना अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरपावर केल्याने अनेक दुकानांवर नोटीस न बजावता कारवाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या आड येणाºया शेड काढण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती. त्यानुसार पालिकेला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. मात्र शेडवर कारवाई करत असताना व्यापाºयांच्या भरलेल्या दुकानांवर पालिकेने जेसीबी फिरवला आहे. दुकानांवर कारवाई करतांना संबंधितांना मार्किंग देणे गरजेचे होते. कोणतीही नोटीस न बजावता कारवाई करण्यात आली आहे.
कात्रप डीपी रोडवर असलेल्या दुकानांवर अशाच प्रकारे कारवाई केली आहे. रस्ता ६० फूट रूंद असतानाही ८० फुटाप्रमाणे पालिकेने कारवाई केली आहे. मूळात नियोजनात नसतानाही दुकानांवर कारवाई करत थेट सर्व दुकाने जमीनदोस्त केली. या दुकानातील व्यापाºयांना आपले सामान काढण्याची संधीही देण्यात आली नाही. रस्त्याची रूंदी जेवढी आहे तेवढ्या दुकानांवर पालिकेने कारवाई करणे अपेक्षित असताना अधिकाºयांनी थेट दुकानांवर कारवाई केली. या अनपेक्षित कारवाईमुळे व्यापाºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पालिकेने सुरू केलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात शहरातील बेकायदा शेड तोडण्यात आल्या. मात्र शनिवारी केलेल्या कारवाईत शेडसोबत दुकानांवरही नोटीस न काढता कारवाई केली. दुकानांवर कारवाई करतांना पालिकेने संबंधित दुकानदारांना नोटीस बजावणे बंधनकारक आहे. सोबत त्यांना १५ दिवसांची मुदत देणे अपेक्षित होते. मात्र मुदत तर बाजूलाच राहिली, पालिकेने साधी नोटीसही बजावली नाही. पालिकेच्या या मुजोरीमुळे अनेक दुकानदारांची जुनी दुकाने तोडली गेली. पोलीस बंदोबस्ताचा गैरवापर पालिकेने केल्याचा आरोप व्यापाºयांनी केला आहे.अधिकारी बोलण्यास तयार नाहीतया संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी प्रकार बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी झाला नाही. तर इतर अधिकारी या संदर्भात कोणतीच प्रतिक्रीया देण्यास पुढे सरसावत नसल्याचे दिसत आहे.तीन वर्षांपूर्वीही पालिकेने स्टेशन ते कात्रप डीपी रोडचे रूंदीकरण केले होते. या कारवाईनंतर सर्व दुकानांवर कारवाई करून ती दुकाने रस्त्यापासून दूर केली. ६० फुटी रस्ता मोकळा केल्यावर पुन्हा पालिकेने कारवाई केली आहे. वाढीव बांधकाम नसतांनाही पुन्हा कारवाई झाल्याने पालिकेच्या कारवाईबाबत नाराजी उमटत आहे.