आदर्श विकास मंडळातर्फे ‘आझादी @ ७५’ कार्यक्रमांचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:45+5:302021-08-12T04:45:45+5:30
ठाणे : आदर्श विकास मंडळ, कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श इंग्लिश स्कूल, बाल विद्यामंदिर प्राथमिक व ...
ठाणे : आदर्श विकास मंडळ, कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श इंग्लिश स्कूल, बाल विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी ‘आझादी @ ७५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध स्पर्धा, वेबिनार, सेमिनार, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम हाेणार आहेत. मंगळवारीपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. १५ ऑगस्टपर्यंत ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कार्यक्रम रंगणार आहेत.
मंडळाने दहा विविध विषयांवरील स्पर्धा, १९४७ पासून आर्थिक घडामोडी, भारतीय संविधान, विदेशी थेट गुंतवणूक, पंचवार्षिक योजना यांसारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या विषयांवर कार्यशाळा, एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे विविध पर्यावरणपूरक उपक्रम घेण्यात आले. मंगळवारपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन कार्यक्रमास सुरुवात होत आहे. १० ऑगस्टला छायाचित्रकार स्वप्नील पवार याांनी संवाद साधला. ११ ऑगस्टला ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक व राजकीय विश्लेषक संदीप प्रधान हे १२ ते १ यावेळेत ऑनलाइन, १२ ऑगस्टला दिग्दर्शक विजू माने व १३ ऑगस्टला वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील हे ११ ते १२ या वेळेत ऑफलाइन, १३ ऑगस्टला दुपारी ३ ते ४ यावेळेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मं. गो. हे ऑनलाइन, १४ ऑगस्टला प्रा. नरेंद्र पाठक सकाळी ११ ते १ या वेळेत ऑफलाइन हे मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हे कार्यक्रम मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रसारित होणार आहेत. ऑफलाइन कार्यक्रम केबीपी महाविद्यालयाच्या आवारात होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी सांगितले. ऑफलाइन कार्यक्रम हे कोरोनामुळे मर्यादित संख्येत होणार असल्याने हा कार्यक्रम ऑनलाइनही पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.