६० कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:45 AM2021-09-06T04:45:12+5:302021-09-06T04:45:12+5:30
------------------------------ गणेश मंडळांना लसीकरण केंद्रासाठी परवानगी द्या डोंबिवली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अटकाव करण्यासाठी गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू ...
------------------------------
गणेश मंडळांना लसीकरण केंद्रासाठी परवानगी द्या
डोंबिवली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अटकाव करण्यासाठी गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी डोंबिवली युवा सेनेचे अनमोल म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सरकारच्या मोहिमेला हातभार लागेल, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. लसींचा साठा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-------------------------------
शिक्षकांचा डॉक्टरांकडून गौरव
कल्याण : शिक्षणाच्या कार्यासह सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षकांचा कल्याणातील डॉक्टरांच्या संघटनांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत गौरव केला. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रेडिओलॉजिस्ट संघटनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अशोक प्रधान यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आणि रेडीओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ हरीश शहाददपुरी यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमात कल्पना पवार, रंजना जांगरा, सरिता काळे, अक्षता भोसले, शशी शेट्टी आदी शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील मुलांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
---------------------------------------