अंबरनाथ : नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू,उपनगराध्यक्षांचा आरोप : पुलाचे काम न केल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:28 AM2017-12-22T02:28:08+5:302017-12-22T02:28:32+5:30
अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ : अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर परिसराला लागून नाला आहे. त्यामुळे नाल्यावरील जुन्या पुलावरुनच या नागरिकांची येजा असते. नाल्यावरील पूल धोकादायक झाल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी शेख यांनी पालिकेत केली होती. मात्र प्रत्येकवेळी त्याला बगल देण्याचे काम केले. या पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच तीन दिवसांपूर्वी अडीच वर्षाचा राघवन वीरमुरगन हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्याच्या घरच्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र तो सापडलाच नाही. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रारही दिली होती. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह स्वामीनगरच्या नाल्यात सापडला. या चिमुकल्याच्या मृत्यूस धोकादायक पूलच जबाबदार असल्याचा निष्कर्ष शेख यांनी काढला आहे.
पुलावर खेळत असताना तो नाल्यात पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने ६० लाख मंजूर केले आहे. मात्र त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही असा आरोप त्यांनी केला आहे.