ठाणे मतदारसंघातून आनंद परांजपे? गणेश नाईक यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:08 AM2019-02-20T03:08:50+5:302019-02-20T03:09:23+5:30

गणेश नाईक यांचा नकार : संजीव नाईक यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींचा विरोध

Anand Paranjpe from Thane constituency? Ganesh Naik's denial | ठाणे मतदारसंघातून आनंद परांजपे? गणेश नाईक यांचा नकार

ठाणे मतदारसंघातून आनंद परांजपे? गणेश नाईक यांचा नकार

googlenewsNext

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी लढावे अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली असली, तरी नाईकांनी ही निवडणुक लढण्यास असमर्थता दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव आघाडीवर आहे. बुधवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आव्हाड तयार नसल्याने त्यांच्या जागी कोण हे कोडे पुण्यातील बैठकीतच सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील आठवड्यात ठाण्यात झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांनी ठाणे तर जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण लोकसभा लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असली, तरी गणेश नाईक तयार नसल्याचे समजते. या मतदारसंघातून पुत्र संजीव नाईक यांनीच लढावे अशी इच्छा गणेश नाईक यांची आहे. परंतु श्रेष्ठींची संजीव यांच्या नावाबाबत नाराजी असल्याने त्यांचे नाव पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या गळ््यात उमेदवारीची माळ बळेबळे घातली जाणार असे चित्र दिसत असताना त्यांनी ठामपणे नकार दिल्याने आता ठाणे मतदारसंघाची माळ कुणाच्या गळ््यात घालणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बुधवारी पुणे येथे पुन्हा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत आनंद परांजपे यांनी ठाणे लोकसभा लढवावी यावर चर्चा होणार आहे. परंतु परांजपे निवडणूक लढवण्यास तयार होतील का, याबाबत संभ्रम आहे. यापूर्वी परांजपे यांनी कल्याण लोकसभा लढविली होती. ते ठाण्यात वास्तव्यास असले तरी त्यांचा ठाणे लोकसभा मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही. ही त्यांच्यासाठी कमकुवत बाजू मानली जात आहे. सुशिक्षित उमेदवार म्हणून परांजपे यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र मतदारसंघ काबीज करायचा झाल्यास मतांमधील मोठा फरक त्यांना पार करावा लागणार आहे.

कल्याण मतदारसंघाचा तिढा कायम
च्ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र असून त्यातील ऐरोली वगळला तर, बेलापूर, मीरा-भाईंदर आणि ठाणे विधानसभेवर भाजपाचे वर्चस्व आहे. कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे.

च्ठाणे मतदारसंघाची स्थिती पाहता परांजपे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आव्हाड आणि परांजपेही इच्छुक नसल्याने कुणाला संधी मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title: Anand Paranjpe from Thane constituency? Ganesh Naik's denial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.