शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

ठाणे मतदारसंघातून आनंद परांजपे? गणेश नाईक यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 3:08 AM

गणेश नाईक यांचा नकार : संजीव नाईक यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींचा विरोध

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी लढावे अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली असली, तरी नाईकांनी ही निवडणुक लढण्यास असमर्थता दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव आघाडीवर आहे. बुधवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आव्हाड तयार नसल्याने त्यांच्या जागी कोण हे कोडे पुण्यातील बैठकीतच सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील आठवड्यात ठाण्यात झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांनी ठाणे तर जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण लोकसभा लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असली, तरी गणेश नाईक तयार नसल्याचे समजते. या मतदारसंघातून पुत्र संजीव नाईक यांनीच लढावे अशी इच्छा गणेश नाईक यांची आहे. परंतु श्रेष्ठींची संजीव यांच्या नावाबाबत नाराजी असल्याने त्यांचे नाव पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या गळ््यात उमेदवारीची माळ बळेबळे घातली जाणार असे चित्र दिसत असताना त्यांनी ठामपणे नकार दिल्याने आता ठाणे मतदारसंघाची माळ कुणाच्या गळ््यात घालणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

बुधवारी पुणे येथे पुन्हा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत आनंद परांजपे यांनी ठाणे लोकसभा लढवावी यावर चर्चा होणार आहे. परंतु परांजपे निवडणूक लढवण्यास तयार होतील का, याबाबत संभ्रम आहे. यापूर्वी परांजपे यांनी कल्याण लोकसभा लढविली होती. ते ठाण्यात वास्तव्यास असले तरी त्यांचा ठाणे लोकसभा मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही. ही त्यांच्यासाठी कमकुवत बाजू मानली जात आहे. सुशिक्षित उमेदवार म्हणून परांजपे यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र मतदारसंघ काबीज करायचा झाल्यास मतांमधील मोठा फरक त्यांना पार करावा लागणार आहे.कल्याण मतदारसंघाचा तिढा कायमच्ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र असून त्यातील ऐरोली वगळला तर, बेलापूर, मीरा-भाईंदर आणि ठाणे विधानसभेवर भाजपाचे वर्चस्व आहे. कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे.च्ठाणे मतदारसंघाची स्थिती पाहता परांजपे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आव्हाड आणि परांजपेही इच्छुक नसल्याने कुणाला संधी मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९