- नितिन पंडीत
भिवंडी- नवरात्री उत्सव अर्थात देवीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव या निमित्त सर्वत्र विविध रूपातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात येत असताना भिवंडीत अंगणवाडी सेविकांनी देवी प्रतिष्ठापना केलेल्या मंडळांना भेटी देत त्या ठिकाणी नृत्याच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ चा जागर केला जात आहे . त्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प भिवंडी शहर नागरी विभागाचा पर्यवेक्षिका शर्मिला जाधव व तृप्ती भोये यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांचे पथक देवी उत्सव मंडळांना भेटी देऊन हा उवक्रम राबवित आहेत.
सोमवारी शहरातील भादवड येथे कै महेंद्र म्हात्रे समाज कल्याणकारी सामाजिक संस्थे तर्फे आयोजित नवरात्रो उत्सवात या अंगणवाडी सेविकांनी भेट देत त्या ठिकाणी महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. नवरात्र उत्सवात आपण देवीच्या नऊ रुपांची पूजा करीत असताना आपल्या कुटुंबात आई ,पत्नी ,बहीण,मुलगी या रूपातील महिलांचा सन्मान होणे ही गरजेचे असल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जागर स्त्री शक्तीचा ,जागर समानतेचा, जागर आरोग्याचा,जागर सन्मानाचा या बाबत स्थानिक महिलां मध्ये जनजागृती करून हा नवरात्रो उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्मरणीय पद्धतीने साजरा केला जात असल्याची माहिती पर्यवेक्षिका शर्मिला जाधव यांनी दिली.तर भादवड येथील नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने सुचिता रुपेश म्हात्रे ,विनिता संजय म्हात्रे , अनिता नरेश म्हात्रे यांनी सर्व अंगणवाडी सेविकांचा या उपक्रम बद्दल सन्मान केला आहे .