नव्या पादचारी पुलाला पायऱ्यांचे आणखी एक लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:39 AM2021-02-13T04:39:06+5:302021-02-13T04:39:06+5:30
अनिकेत घमंडी डोंबिवली : कोविड-१० च्या कालावधीत मध्य रेल्वेने डोंबिवलीकर प्रवाशांसाठी कल्याण दिशेकडील पादचारी पूल नव्याने उभारून पूर्ण केला. ...
अनिकेत घमंडी
डोंबिवली : कोविड-१० च्या कालावधीत मध्य रेल्वेने डोंबिवलीकर प्रवाशांसाठी कल्याण दिशेकडील पादचारी पूल नव्याने उभारून पूर्ण केला. डिसेंबरदरम्यान त्याचे कोणताही डामडौल न करता लोकार्पणदेखील केले. आता त्याच पुलाच्या पूर्वेकडील पायऱ्यांचे लँडिंग असलेले एक नवे प्रवेशद्वार लवकरच खुले केले जाणार आहे.
फलाट क्रमांक ५ नंतर स्कायवॉकच्या आधी सध्या पूर्वीप्रमाणेच एक प्रवेशद्वार असून, ते थेट डॉ. राथ रस्त्यावर उतरत आहे. मात्र, त्यामुळे प्रवाशांच्या अपघाताची शक्यता असल्याने हा महत्त्वपूर्ण बदल मध्यरेल्वेने करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे अभ्यासकांनी त्या बदलाचे कौतुक केले असून, अभियंत्यांच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या बदलामुळे आगामी काळात सध्याचे असलेले पायऱ्यांचे प्रवेशद्वार बंद करण्यात येईल, असेही रेल्वेच्या प्रकल्प अभियंत्यांनी स्पष्ट केले. या नव्या बदलामुळे कोणतीही गैरसोय होणार नसून सोय, सुरक्षेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे हा बदल प्रवासीहितावह निर्णय ठरेल, असाही रेल्वे अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला.
नव्या पायऱ्यांच्या लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात असून, काही दिवसांत ते पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेचच तो बदल प्रवाशांसाठी खुला करण्याचाही रेल्वेचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
----------
फोटो आहे.