‘असहकारा’ने कर्जमाफी अडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:35 AM2017-07-31T00:35:07+5:302017-07-31T00:35:07+5:30
थकबाकीदार शेतकºयांची शिफारस करणाºया सेवा सोसायट्यांच्या गटसचिवांनी जिल्ह्यातील सुमारे ४० दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
सुरेश लोखंडे ।
ठाणे : थकबाकीदार शेतकºयांची शिफारस करणाºया सेवा सोसायट्यांच्या गटसचिवांनी जिल्ह्यातील सुमारे ४० दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरणाºया १५ हजार ७२९ शेतकºयांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेकडे अद्यापही शिफारस करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शेतीच्या कामात व्यस्त असलेला व आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफीचा मोठा आधार मिळणार होता, मात्र टीडीसीसी बँकेला त्यांचा प्रस्ताव पाठवणारे ११३ गटसचिवांनी शासन व बँकेच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे त्यांनी या पात्र शेतकºयांच्या याद्या टीडीसीसीला दिल्या नाहीत. त्याचा फटका कर्जमाफीच्या पात्र शेतकºयांना बसला आहे. या गटसचिवांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होईपर्यंत हे असहकार आंदोलन सुरूच राहणार आहे. यामुळे कर्जमाफ होऊनही त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील शेतकरी अद्याप वंचित आहे.
ठाणे जिल्हा गटसचिव संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील या सेवा सोसायटींच्या गटसचिवांनी शासन व टीडीसीसी बँकेला कोणत्याही प्रकारची माहिती न पुरवण्याचे असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यात कर्जमाफीच्या लाभासाठी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. जिल्ह्यातील ४१० सोसायटींच्या ११३ गटसचिवांनी हे बेमुदत असहकार आंदोलनाचा फटका शेतकºयांना बसत आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ७९ कोटी ५० लाखांच्या कर्जमाफींसह ६२ कोटी २१ लाखांच्या पीक कर्ज माफीच्या लाभाला सुमारे १३ हजार १७४ शेतकरी पात्र आहेत. यामध्ये १७ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा लाभ दोन हजार ५५५ शेतकºयांना झाला नाही. यामध्ये एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकरी; तर दोन हेक्टरपर्यंतचे सुमारे पाच हजार २५८ मध्यम शेतकºयांचा समावेश आहे.