शेअर मार्केटचे आमिष, ३९ लाखांची फसवणूक, WhatsApp ग्रुप एडमीनवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: March 6, 2024 05:51 PM2024-03-06T17:51:37+5:302024-03-06T17:52:30+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात दिपक शोभराज दुलानी हे कुटुंबासह राहत असून ते व्यवसायाने व्यापारी आहेत.
उल्हासनगर : अरिहंत कॅपिटल कस्टमर केअर व एफ-८ विनटोन स्टॉक पुलिंग या WhatsApp ग्रुपच्या एडमीनने ब्रोकर असल्याचे भासवून दिपक दुलानी यांची ३९ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात श्रिया एकेला, मिलिन वासुदेव व रोनल बिलाला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात दिपक शोभराज दुलानी हे कुटुंबासह राहत असून ते व्यवसायाने व्यापारी आहेत. अरिहंत कॅपिटल कस्टमर पुलिंग या WhatsApp ग्रुपचे श्रिया एकेला व मिलिन वासुदेव तसेच एफ-८ विनटन स्टॉक पुलिंग WhatsAppग्रुपचे अडमीन रोनक बिलाला या तिघांच्या WhatsApp ग्रुपमध्ये दीपक शोभराज दुलानी हे सदस्य आहेत. २३ डिसेंबर २०२३ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान या ग्रुपच्या श्रिया अकेला, मिलिन वासुदेव व रोनक बिलाला यांनी दुलानी यांना ब्रोकर असल्याचे भासवून जादा पैसे मिळण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले. तब्बल ३९ लाख ५ हजार रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शहरातील व्यापारी दीपक दुलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला फसवणुकीचा प्रकार पोलिसांना कथन केला. अखेर पोलिसांनी WhatsApp ग्रुप अडमीन श्रिया अकेला, मिलिंद वासुदेव व रोनक बिलाला यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.