शहरं
Join us  
Trending Stories
1
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
3
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
4
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
5
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
6
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
7
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
8
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
9
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
10
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
11
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
12
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
13
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
14
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
15
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
16
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
17
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
18
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
19
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
20
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं

‘बॅण्डबाजा’ ठरतोय डोकेदुखी

By admin | Published: March 03, 2016 2:10 AM

आर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बॅण्डबाजा वाजवण्याचा मनपाचा फंडा दहावी-बारावीचे विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण यांच्याकरिता डोकेदुखी ठरला आहे.

धीरज परब, मीरा रोडआर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बॅण्डबाजा वाजवण्याचा मनपाचा फंडा दहावी-बारावीचे विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण यांच्याकरिता डोकेदुखी ठरला आहे. ज्यांनी नियमित कर भरला त्यांनाही या बॅण्डबाजाची डोकेदुखी सहन करावी लागत असल्याने महापालिका प्रशासनाकडून शांतता क्षेत्रात ध्वनिप्रदूषण केले जात असल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली काही संघटनांनी सुरू केल्या आहेत.कर वसूलीकरता थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बॅण्डबाजा वाजवण्याची कायद्यात तरतूद नाही. शाळा, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे या शांतता क्षेत्रांत यामुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. त्यातच सध्या १०वी, १२वीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडूनही तक्रारी येत आहेत. सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरत असलेली ही बेकायदा ‘बॅण्डबाजा वसुली’ बंद करण्याची मागणी ‘जिद्दी मराठा संस्थेने’ केली आहे.मीरा-भार्इंदर महानगरपालिकेला दरवर्षी आर्थिक वर्ष संपायला आले की, मालमत्ता करवसुली बाकी असल्याचा साक्षात्कार होतो. यंदाही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेची लगीनघाई सुरू झाली आहे. वसुलीकरिता नळजोडण्या तोडण्यापासून बॅण्डबाजा वाजवण्यापर्यंत अनेक हातखंडे अमलात आणले जातात. पालिकेचे करवसुली करणारे लिपीक बॅण्डबाजा वाजवत सर्वत्र फिरतात. बॅण्डबाजाच्या कर्णकर्कश कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने नागरिक त्रासले आहेत. थकबाकीदारांकरिता वाजविण्यात येणारा हा बॅण्डबाजा ज्यांनी कर भरला त्यांच्याकरिता जाचक ठरत आहे. १०वी व १२वीच्या परीक्षार्थ्यांनी या बॅण्डबाजाविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. शाळा, रुग्णालय आदी शांतता क्षेत्रात तो वाजवल्याने पालिकेकडून ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार जिद्दी मराठा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी पोलीस अधीक्षक, पालिका आयुक्त व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली आहे.