पे अँड पार्कमधील दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:33+5:302021-07-31T04:39:33+5:30
------------------------------------- मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा डोंबिवली : पैशाच्या वादावरून तुषार गुप्ता, रहीम शेख, अविनाश भारद्वाज आणि सुजन गुप्ता यांनी ...
-------------------------------------
मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
डोंबिवली : पैशाच्या वादावरून तुषार गुप्ता, रहीम शेख, अविनाश भारद्वाज आणि सुजन गुप्ता यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार हेमंत गुप्ता याने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. मारहाणीचा प्रकार दावडी परिसरात मंगळवारी रात्री ९ वाजता घडला. तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------
कार चोरीला
कल्याण : प्रवीण भोईर यांनी त्यांची कार सोमवारी पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील राजेंद्र एंटरप्राइजेस दुकानासमोर उभी केली होती. तेथून ती कार मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------
दांडक्याने मारहाण
डोंबिवली : उदय यादव यांना वाल्मीकी यादव याने अपशब्द वापरून दांडक्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता पूर्वेतील सोनारपाडा परिसरात घडली. याप्रकरणी उदय यांच्या तक्रारीवरून वाल्मीकी यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------
बोगदा परिसरात खड्डे
कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील पूर्वेतील छोट्या बोगद्याजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना कसरतीचा सामना करावा लागत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------------
अखेर घरडा सर्कल चौकातील खड्डे बुजले
डोंबिवली : जूनमध्ये पावसाच्या प्रारंभीच बहुतांश ठिकाणी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असताना मुख्य चौकांनाही खड्ड्यांचा विळखा पडल्याचे वृत्त २१ जुलैला ‘लोकमत’ने ‘मुख्य चौकांना पडला खड्ड्यांचा विळखा’ या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत या चौकांच्या परिसरातील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल परिसरातील खड्डे खडीकरणाने भरण्यास सुरुवात केली आहे; परंतु वाहनांची वर्दळ पाहता खडीकरणाची मात्रा खड्ड्यांवर कितपत प्रभावी ठरेल, याबाबत मात्र साशंकता आहे.
----------------------------------------------