डोंबिवली : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमध्ये केडीएमसीचे माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यांच्या कार्यकाळात बायोमेट्रिक हजेरी यंत्रे बसवण्यात आली आहेत. या यंत्रांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत असल्याने यंत्राशी पुन्हा छेडछाड होण्याची दाट शक्यता आहे.
दांडीबहाद्दर आणि लेटलतीफ अधिकारी-कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसवले आहेत. बायोमेट्रिक हजेरी यंत्रामध्ये वर्ग-१ ते ३ च्या अधिकाºयांची आणि वर्ग-४ च्या कर्मचाºयांच्या कामकाजाची ठरावीक वेळ निर्धारित केली आहे. ही यंत्रे काही कर्मचाºयांनी सिगारेटचे चटके देऊन निकामी करण्याचे प्रकार घडले होते. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. तेव्हा या यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेºयांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या येथील बायोमेट्रिक हजेरी यंत्रावर सुरक्षेसाठी बसवलेला सीसीटीव्ही कॅमेराही बंद अवस्थेत आहे. तीन ते चार महिन्यांपासून हा कॅमेरा बंद असल्याची माहिती मिळत आहे. या कॅमेºयाचे नियंत्रण सुरक्षा विभागाच्या दालनातून होते. तेथील सुरक्षा कर्मचाºयांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याला दुजोरा देत अधिक बोलण्यास नकार दिला.