Bird Flu : ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्ष्यांचा मृत्यू, एकाच दिवशी ५३ पक्षी दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 07:51 PM2021-01-19T19:51:38+5:302021-01-19T20:00:37+5:30

Bird Flu : राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतित असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे.

Bird Flu : So far 483 birds have died in Thane, 53 birds have been killed in a single day | Bird Flu : ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्ष्यांचा मृत्यू, एकाच दिवशी ५३ पक्षी दगावले

Bird Flu : ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्ष्यांचा मृत्यू, एकाच दिवशी ५३ पक्षी दगावले

Next
ठळक मुद्देराज्यात देखील आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्युने दस्तक दिली आहे. ठाण्यात देखील या आजाराने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे : ठाण्यात कोरोनापाठोपाठ आता बर्ड फ्ल्युचा फैलाव वेगाने होत असून आतापर्यंत विविध जातीच्या ४८३ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी एका दिवसात ५३ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत सर्वाधिक २२४ कावळे आणि ८३ कबुतरे मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरातील अनेक राज्यात कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्युने डोके वर काढले आहे. राज्यात देखील आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्युने दस्तक दिली आहे. ठाण्यात देखील या आजाराने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे पूर्वपदावर येत असतांनाच या नव्या संकटाने सर्वजण धास्तावले आहेत. 

राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतित असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. ठाण्यात देखील अनेक पक्षी मृत्यमुखी पडले असून याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका देखील सतर्क झाली आहे. ठाणे महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत्यू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आता शहरात रोजच्या रोज पक्षी मृत होण्याचे प्रमाण वाढत जात आहे. दुसरीकडे पालिकेने मागील काही दिवसात शहरातील सर्वच चिकन विक्रेत्या दुकानांची पाहणी केली होती. परंतु त्यात काही विशेष आढळलेले नाही. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत शहरात ४८३ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

वाघबीळ, कावेसर, कासारवडवली, आनंदनगर, ओवळा या भागात ६१, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, ब्रह्मांड, कापुरबावडी, आझादनगर, हिरानंदानी इस्टेट या भागात ३७, तुळशीधाम, कोकणीपाडा, पवारनगर, वसंतविहार, टिकूजीनीवाडी या भागात १५, लोकमान्यनगर, सावरकरनगर, यशोधननगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर आणि कोरस या भागात ५५, श्रीनगर, किसननगर, वागळे इस्टेट, अंबिकानगर, ज्ञानेश्वार नगर या भागात ३३, मनोरुग्णालय परिसर, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर या भागात ८८, कोपरी भागात ५, चरई, घंटाळी, नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी या भागात १३, कोलबाड, खोपट या भागात १३, श्रीरंग, वृंदावन, राबोडी, साकेत, माजिवाडा या भागात २१, कळवा, खारेगाव, मुंब्रा आणि दिवा या भागात १४२ पक्षी आतापर्यंत मृतावस्थेत आढळून आले आहेत.  

मृत पक्ष्यांची संख्या...
कोंबडी १३४
बगळे २४
कावळे २२४
कबुतर ८३
पोपट ५
पाण बगळा २४
कोकीळ ४
बदक १
गरुड १
चिमणी २
पाण कोंबडी १

Web Title: Bird Flu : So far 483 birds have died in Thane, 53 birds have been killed in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.