ठाणे : बिहारी महिलांच्या संदर्भात भाजपआमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष प्रभाकर सिंह, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तिवारी नेतृत्त्वाखाली मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आ. धस यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले.
‘‘बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले तर मुलगा झाला असे सांगतात.कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात इथे आणि त्यांना मुले तिकडे होतात,’’ असे वक्तव्य धस यांनी बीड येथील एका जाहीर सभेत केले आहे. त्यामुळे बिहारी महिलांचा अवमान झाला आहे, अशा आमदारावर कारवाई करावी, अशी मागणी करून शहराध्यक्ष परांजपे यांच्या नेतृत्त्वाखाली ही जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.महिलांचा अवमान हीच भाजपाची संस्कृतीच्यापूर्वीही भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर येथील प्रचारसभेत लष्करातील जवानांच्या पत्नींबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता धस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करून भाजपची संस्कृती काय आहे, हे दाखवून दिले आहे. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले- आंबेडकरी विचारधारेचा आहे.च्या महाराष्ट्रामध्ये राहून अशा पद्धतीने आमच्या मायभगिनींचा अवमान करण्याचे धाडस या लोकांचे होतेच कसे? भाजपची ही संस्कृती आमचा महाराष्ट्र सहन करणार नाही. भाजपने या देशाची संस्कृती बिघडवण्यास सुरु वात केली आहे. त्यांनी आता आपल्या चिंतन बैठकीमध्ये धस यांच्यासारख्या प्रवृत्तींवर चिेंतन करावे, असे सांगून उत्तर भारतीयोंके सन्मान मे राष्ट्रवादी अब मैदान मे, असा नारा दिला.