लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : मुंबईत राहणा-या महाविद्यालयीन तरु णाचा मृतदेह बदलापूर स्थानकाजवळील रेल्वे रूळांवर आढळला. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास रेल्वे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र त्याचा मृत्यू अपघाती नसून ही हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.राम भोजने (२२) असे या तरुणाचे नाव आहे. रामची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रूळांवर आणून टाकल्याचा आरोप त्याचे वडील गुरुदत्त भोजने यांनी केला आहे. राम आणि त्याचे कुटुंब हे पूर्वी बदलापूरमध्ये राहत होते. त्यांचे बदलापूरमध्ये घर आहे. राम अधूनमधून अभ्यास करण्यासाठी या घरी येत होता. शेजारी राहणाºया एका महिलेला त्याने काही पैसे दिले होते. ते परत घेण्यासाठी राम गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास मुंबईहून बदलापूरला आला होता. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी रामचा अपघातात मृत्यू झाल्याचे त्याच्या भावाला कळवले. मात्र, रामचा अपघात झाला नसून पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्याची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर, त्याचा मृतदेह रेल्वे रु ळांवर आणून टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी बदलापूर रेल्वे पोलिसांनी प्राथमिक तपासणीनुसार अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, रामच्या घरच्यांच्या आरोपानुसार तपास करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईत राहणा-या महाविद्यालयीन तरु णाचा मृतदेह रेल्वे रूळांवर आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:56 AM