लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप पिकांचा विमा काढला आहे. पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१, या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या नुकसानीची माहिती देण्याच्या जटिल अटीतून आता सुटका झाली आहे. परंतु, शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासात दिलेल्या सहा पर्यायांपैकी एकास कळविणे आवश्यक आहे. यानंतर या नुकसानीचे वैयक्तिक अहवाल वेळीच कंपनीला दिल्यास शेतकरी भरपाईस पात्र ठरण्याचे नवीन नियम आता लागू केले आहेत.
पंतप्रधान पीकविमा योजनाअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईस शेतकरी पात्र ठरत आहे. यामध्ये शेती जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पीक नुकसानग्रस्त झाल्यास त्या पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीदरम्यान विमासंरक्षित क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, तर या नुकसानग्रस्त शेतातील पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा कंपनीला देण्याकरिता आता नव्याने सहा पर्याय दिले आहेत.
-------------
१) आधी काय होते दोन पर्याय (बॉक्स) -
१) पाऊस आणि बिगरमौसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून पाठविल्यास भरपाई पात्र.
२) प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे होणारे नुकसान भरपाईस पात्र.
३) पीक काढण्याच्या १५ दिवस आधी होणारी नुकसान भरपाई
-----------