शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

बुलेट ट्रेनसाठी रुग्णालय, शाळा, पोलीस स्टेशनचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 5:20 AM

आरक्षण बदलाचा प्रस्ताव महासभेत : शिवसेनेची मवाळ भूमिका

ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावर राज्य पातळीवर शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपशी युती झाल्याने शिवसेनेने आता मवाळ भूमिका घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागे ज्या प्रस्तावाला शिवसेनेने केराची टोपली दाखविली होती, त्याच बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला आता अनुमती दर्शवत हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणला गेला आहे. या बुलेट ट्रेनसाठी १९.४९ हेक्टर जमीनीचे भूसंपादन आणि म्हातार्डी येथे स्थानकासाठी १७.१३ हेक्टर जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. यामध्ये ठाणे महापालिकेचा ट्रिटमेंट प्लॅन्ट, पंपीग स्टेशन महापालिकेची हौसिंगची योजना, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा, हॉस्पिटल अशी विकास आराखड्यातील विविध आरक्षणे बाधित होणार आहेत. त्यानुसार या आरक्षणांच्या फेरबदलाचा महत्वाचा प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्टÑवादीची मंडळी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बुलेट ट्रेन ही ठाणे महापालिका हद्दीतील शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. येथील भूखंड संपादीत करण्याबाबत यापूर्वी आदेश झालेले आहेत. या भूखंडांच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार मंजूर नकाशात ठाणे महापालिका हद्दीतील आखणीची लांबी ही १११३५. ०० मीटर एवढी असून, रुंदी १७.५० मीटर धरण्यात आली आहे.त्यानुसार १९.४९ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. म्हातार्डी येथे स्थानक उभारले जाणार असल्याने त्यासाठी १७.१३ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. यामुळे ठाणे महापालिकेची येथील विविध आरक्षणे बाधित होणार आहेत. यामध्ये काही आरक्षणांना जास्त, तर काही आरक्षणांना कमी प्रमाणात फटका बसणार आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१८ मध्ये हा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सादर करुन महापौरांकडे पाठविला होता. मात्र शिवसेनेने सुरूवातीपासूनच बुलेट ट्रनेच्या विरोधात भूमिका घेतली असल्याने हा प्रस्ताव पटलावर आणलाच नव्हता. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपने एकमेकांबरोबर घरोबा केला आहे. त्यामुळेच आता बुलेट ट्रनेच्या आरक्षण बदलांचा प्रस्तावही महासभेत मंजुरीसाठी घेण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे.अशी होणार आरक्षणे बाधितया आरक्षण फेरबदलानुसार सेक्टर १० मधील प्रस्तावित लोकोशेड -२ चे आरक्षणाचे क्षेत्र हे १५.०० हेक्टर असून, त्यातील ४.०६ टक्के आरक्षण बाधित होणार आहे. येथील १०.९४ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महापालिका प्राथमिक शाळेच्या ०.६० हेक्टर क्षेत्रापैकी ०.००७२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.५१ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. रिक्रिएशन ग्राऊंडचे १.१९ हेक्टर क्षेत्रापैकी ०.४१ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.७८ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. बसस्थानक, प्रभाग कार्यालय आणि हॉस्पिटलचे अनुक्रमे ०.२८, २.४० आणि २.४० हेक्टर क्षेत्रापैकी ०.०५, ०.३० आणि ०.०३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, अनुक्रमे ०.२०, २.१० आणि २.३७ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.दुसरीकडे सेक्टर ११ मधील प्रस्तावित सिव्हरेज ट्रिटमेंट प्लॅन्ट, पंपीग स्टेशनच्या ०.५० हेक्टरच्या आरक्षणापैकी ०.११ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, ०.३९ हेक्टर आरक्षण शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल हाऊसिंगच्या ४.२५ हेक्टर क्षेत्रापैकी ०.१५ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, ४.१० हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महाविद्यालयाच्यह १.८१ हेक्टर क्षेत्रापैकी ०.३१ हेक्टर बाधित होणार असून १.५० हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. प्रस्तावित दहनभूमिचे १.०८ हेक्टर आरक्षणापैकी ०.६ हेक्टर बाधित होणार असून १.०२ हेक्टर शिल्लक राहणार आहे. महानगरपालिकेने विविध सार्वजनिक उद्देशांसाठी राखीव ठेवलेल्या ०.७३ हेक्टर क्षेत्रापैकी ०.५१ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून केवळ ०.२२ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. पोलीस स्टेशनच्या ०.३९ हेक्टर क्षेत्रापैकी ०.०६ हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून ०.३३ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.शिवसेना आता या प्रस्तावाच्या बाजूने असली तरी राष्टÑवादीचा या प्रस्तावाला सुरवातीपासूनच विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेला कोंडीत धरण्याची आयती संधी राष्टÑवादीला मिळणार आहे. त्यामुळे सेनेचे नगरसेवक आता काय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईShiv Senaशिवसेना