शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:56 PM2018-02-19T16:56:30+5:302018-02-19T16:58:19+5:30
शिवजयंती उत्साहात साजरी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली- येथील विविध संस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली.
डोंबिवली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा ही आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कॉग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आरबीटी विद्यालयातील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीन सिंग यांनी नगर येथील भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांचा निषेध केला.
सकल मराठा समाज डोंबिवलीतर्फे सकाळी ८ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी स्मारकापासून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ओव्हरब्रिज, पश्चिम स्टेशन परिसर, महात्मा फु ले रोड,उमेश नगर,रेतीबंदर चौक, सम्राट चौक, जोंधळे हायस्कूल, पूर्वेला टंडन रोड, चार रस्ता, शेलार चौक, घरडा सर्क ल, बंदिश पॅलेस, टाटा पावर, श्रीराम चौक, पत्रीपूल, शिवाजी चौक या मार्गी फिरून दुर्गाडी किल्लायेथे तिचा समारोप झाला. सुमारे ४५० बाईकस्वार या रॅलीत सहभागी झाले होते. सायंकाळी श्री गणेश मंदिर संस्थान ते शिवाजी महाराज स्मारक या रस्त्यावरून पालखी सोहळा पार पडला. यामध्ये लेझीम पथक, ढोलताशा पथक सहभागी झाले होते. संस्थेतील काही सदस्यांनी यावेळी मर्दानी खेळ सादर केले. यामध्ये ४५० जण सहभागी झाले होते. शिवाजी महाराज व गड किल्ले यावर सागर शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी लक्ष्मण मिसाळ, दत्ता माळेकर, निखील माने, राजेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुत्व प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ, निळजे यांच्यातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सकाळी बाईक रॅली काढण्यात आली होती. बाईक रॅली ज्येष्ठ नागरिक भवन निळजे येथून प्रारंभ झाला. त्यानंतर कासारिओ, लोढा हेवन, देसाई गाव, कासारिओ गोल्ड, पलावा सिटी, काटई, कोळे, घेसर या मार्र्गे फिरविण्यात आली. महाराजांची प्रतिमा पूजन व अभिवादन पार पडले. सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे व त्यांचे सहकारी यांनी पोवाडे सादर केले. संतसाहित्य तथा शिवचरित्र अभ्यासक ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच पालखी सोहळा ही यावेळी पार पडला अशी माहिती कवी किरण पाटील यांनी दिली.
-----------------------------------------------------------------