केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:35 PM2021-10-14T16:35:50+5:302021-10-14T16:52:58+5:30

ठाण्यात पालकमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री असतांना देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होणे अयोग्य असून या दोघांनी एकत्र बैठक घेऊन पंतप्रधान आवास योजना मार्गी लावावी अशा सुचना देखील त्यांनी केल्या.

Central Minister Kapil Patil expressed public displeasure over avoiding mentioning the Center | केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

googlenewsNext

ठाणे:  लॉकडाऊनमुळे स्वत:चे घर काय असते, हे प्रत्येकालाच समजले. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या किंवा भाडेतत्वावर वास्तव्य करणा:यांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद असल्याचे मत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. परंतु म्हाडाच्या या ८ हजार ९८४ घरांपैकी पंतप्रधान आवास योजनेतील ६१८० घरे असतांनाही पंतप्रधानांचा साधा कुठेही उल्लेख नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या घरांसाठी अनुदान स्वरुपात केंद्राकडून दिड लाख तर राज्याकडून एक लाखांचा निधी दिला गेला आहे. त्यामुळे यात केंद्राचा वाटा निश्चितच मोठा आहे. असे असतांनाही केंद्राचा नाम्मोलेख टाळणो चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

म्हाडाच्या वतीने ८ हजार ९८४ घरांची सोडत गुरुवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून कपिल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमात केंद्राचाही कुठेही साधा उल्लेख करण्यात आला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात जाहीर नाराजी व्यक्त केली. म्हाडांच्या या एकूण सोडती पैकी घरांमध्ये ६ हजार १८० घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. त्यातील १९०५ घरे तयार असून उर्वरीत घरे लवकरच तयार होणार आहेत. त्यानुसार या घरांसाठी केंद्राकूडन दिड लाखांचे अनुदान देखील दिले जाणार आहे. तसेच राज्याकडून एक लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. परंतु असे असतांनाही पंतप्रधानाचा किंवा केंद्राची कुठेही उल्लेख नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ठिकाणी कुठेही पंतप्रधान आवास योजना साकार होतांना दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ठाण्यात पालकमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री असतांना देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होणो अयोग्य असून या दोघांनी एकत्र बैठक घेऊन पंतप्रधान आवास योजना मार्गी लावावी अशा सुचना देखील त्यांनी केल्या. शिवाय जर या महापालिकांना ही योजना राबविणो शक्य नसल्याच म्हाडाच्या माध्यमातून ही घरे उभारण्यात यावीत यासाठी गृहनिर्माणमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी सुचनाही त्यांनी केली. तसेच बदलापुरमध्ये सुरु असलेल्या अमृत योजनकडेही दुर्लक्ष केले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे देखील २०२२ र्पयत प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सहा हजार घरे पडून आहेत. भविष्यात सिडकोच्या माध्यमातून आणखी ८९ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. परंतु घरी पडून राहत असतील तर निश्चितच हा चिंतेंचा विषय असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सहा हजार घरांसाठी आता सिडको खाजगी संस्थेची मदत घेणार आहे. परंतु कोंबडा कोणाचाही असो तो आरवला पाहिजे आणि लोकांना घरे उपलब्ध झाली पाहिजे यासाठी पालकमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Central Minister Kapil Patil expressed public displeasure over avoiding mentioning the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.