Central Railway : शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 08:14 AM2019-01-10T08:14:05+5:302019-01-10T08:28:52+5:30

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (10 जानेवारी) शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. सकाळीच बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

central railway traffic disrupted due to technical issue in local at shahad railway station | Central Railway : शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Central Railway : शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Next
ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद पडल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. सकाळीच बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (10 जानेवारी) शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. सकाळीच बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. 

याआधी बुधवारी (9 जानेवारी) मुंबईकरांचे हाल झाले होते. कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे कर्जतवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. तसेच याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसला देखील बसला होता. 


Web Title: central railway traffic disrupted due to technical issue in local at shahad railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.