पूरग्रस्तांकडे केंद्रीय पथकाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:38 AM2019-09-04T01:38:26+5:302019-09-04T01:39:01+5:30
जूगाव, दिव्यातील रहिवाशांत संताप : हजारो कुटुंब आहेत मदतीपासून वंचित
सुरेश लोखंडे
ठाणे : भातसा नदीच्या पुरात बुडालेल्या जू गावात अजूनही गावकऱ्यांना घर गाठण्यासाठी चिखल तुडवावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेने हेलिकॉप्टर देवदुतासारखे आले आणि येथील ५९ गावकऱ्यांना जलमय झालेल्या गावातून बाहेर काढले. दिवा परिसरामधील चाळीतील नागरिकांनीही पूरपरिस्थितीमध्ये मरण अनुभवले. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांने भेट देण्याची गरज होती. मात्र पथकाने त्याकडे पाठ फिरवून पूरग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप होत आहे.
कल्याण तालुक्यातील रायता पुलाचे झालेले नुकसान, तर आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी, अंबरनाथच्या हेंद्रेपाडा, कासगाव जवळ पुरात अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेसची जागा, रमेशनगरमधील घरांची पडझड आदी ठिकाणच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रिकल अॅथॉरिटीचे सह संचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणी आयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील, केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधिक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी दिग्गज अधिकाºयांचा समावेश असलेल्या केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील पीक व घर नुकसानीची पाहणी करून राज्य शासनासह केंद्र शासनास अहवाल सुपूर्द केला.
पण या अतिवृष्टीत कसेबसे जीव वाचवलेल्या जू गावच्या रहिवाशांना न भेटताच केंद्रीय पथक दिल्लीला गेले. एकीकडे सुमारे पाच किमी. मुंबई -नाशिक राष्ट्रीय महामार्ग तर घराच्या मागच्य बाजूला भातसा नदी अशा भौगोलिक स्थिती असलेल्या जू गावाला वर्षांनूवर्षांपासून आजपर्यंत खडीचा साधा रस्तादेखील झालेला नाही. यामुळे या केंद्रीय पथकाच्या गाड्यांचा ताथा जू गाव गाठू शकत नसल्याचे वास्तव आहे. पिढ्यानपिढ्यांपासून या गावामधील २५ कुटुंंब केवळ पाऊल वाटेने शहराची संपर्क साधतात. भातसा नदीच्या पुरातून या ५९ गावकºयांना वाचवण्यासाठी एअर फोर्र्सच्या जवानांना माळरानावर हेलिकॉप्टर उतरवून गावकºयांना घ्यावे लागले.
कोलशेत येथे आणून जिल्हा प्रशासनाने त्यांची काही दिवस चांगली व्यवस्था केली. या गावकºयांना भेटायला जाण्यासाठी केंद्रीय पथकाच्या गाड्यांना रस्ताच नसल्यामुळे जू गाव नियोजनात नव्हते. शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला दहा-दहा हजार रूपये अर्थ सहाय्य झाले. तर तीन मुकणे परिवाराना त्यांच्या २८ शेळ्या पुरात वाहून गेल्यामुळे अर्थ सहाय्य झाले. यामध्ये १५ शेळ्या वाहून गेलेल्या गोविंद मुकणे यांना सुमारे ४५ हजार, नऊ शेळ्या वाहून गेलेले अंकुश यांना ३० हजार आणि सुमारे चार शेळ्यांच्या नुकसानीचे ठकूबाई मुकणे यांना २० हजार मिळाल्याचे वास्तव या जू गावात आहे. गावाला रस्ता होण्याची अपेक्षा रवींद्र रामू सवार यांनी स्पष्ट केले. केंद्रीय पथकाने गाावाला भेट दिली असती तर गावाच्या रस्त्याची सुविधा झाली असती, घरे मिळाली असती, असे त्यांनी सांगितले.
गावकरी होते रात्रभर झाडांवर
कल्याण तालुक्यातील खडवली गावाजवळील या जू गावात पाणी भातसा नदीसह नाल्याचे पुराचे पाणी शिरल्याने गावकरी झाडांवर बसले होते. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून याची तत्काळ दखल घेऊन या जे गावच्या ५८ रहिवाशांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढून त्यांना ठाणे जवळील कोलशेत येथे सुखरु प पोहोच केले होते. म्हारळ परिसरात उल्हासनदी पात्राला लागून मोठमोठ्या इमारती झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसून नदी पात्राची पाणी वाहून जाण्यास अडथळा आहे. यामुळे या ठिकाणी तर दरवर्षी पूरस्थिती उदभवून कल्याण - अहमदनगर राष्टÑीय महामार्ग बंद होतो. या अडथळ्यामुळे कांबा, वरप गावाना या उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.
२६ जुलै रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील खडवली जू गावाला बसला. तेथील गावातील इतर कुंटुबांसह आदिवासी कुंटुबांचा जनजिवन विस्कलीत झाले आहे.पाच दिवसांनी पुराचे पाणी कमी झाल्याने आदिवासी कुंटुबांसह इतर नागरिकांना पुन्हा गावात सोडण्यात आले जू हे खडवली जवळ भातसा नदीच्या काठावर आहे. खडवली आदिवासी आश्रम शाळा येथून या गावात जाणारा एकमेव रस्ता आहे. भातसा नदी पात्रामध्ये छोटासा साकव तयार केलेला आहे. त्यावरून जू गावातील नागरिक येजा करतात. मात्र, कोणतीच चारचाकी वाहने येजा करू शकत नाहीत. - राजेश चेन्ने, सरचिटणीस, श्रमजिवी संघटना, कल्याण तालुका
दिव्यात पथक फिरकलेच नाही
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा गाव तर पूर्णपूर्ण खाडीत आहे. विशेष म्हणजे जुने दिवा गावात फारशी पूरस्थिती उद्भवलेली नसली तरी नव्याने झालेल्या चाळी व इमारतींमध्ये खाडीचे पाणी शिरते. या पूरस्थितीत एनडीआरएफच्या जवानांसह हेलिकॉप्टरव्दारे येथील रहिवाशांचे जीव वाचवणे शक्य झाले. या ठिकाणांकडेदेखील केंद्रीय पथकाने पाठ फिरवली आणि रहिवाशांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.