ठाणे: अभिनय कट्ट्याची निर्मिती असलेल्या ‘सिंड्रेला’ या चित्रपटाला झालेल्या द्विवर्षपुर्ती निमित्त रविवारी ३५३ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्यावर ‘आठवण सिंड्रेलाची’ या सदारांतर्गत सिंड्रेलाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रथेप्रमाणे प्रार्थनेनंतर ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर अखिलेश जाधव या बालकलाकाराने ‘बस आली’ ही एकपात्री सादर करत कट्ट्याच्या कार्यक्र माला आरंभ केला. स्वप्नील काळे गणेश गायकवाड यांनी ‘आबुराव बाबुराव’ आणि आदित्य नाकती, पियुष भोंडे, वैभव चव्हाण, प्रशांत सकपाळ यांनी एका स्किटच्या माध्यमातून सिंड्रेलाचा प्रवास कसा झाला हे मांडले. यावेळी ध्वनीचित्र फितीच्या माध्यमातून सिंड्रेलाच्या काही ठळक घडामोडींचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला. सिंड्रेला सिनेमाने फक्त कलाकारच नाही तर टेक्निशियन सुद्धा घडवले अशी प्रांजळ कबुली परेश दळवी याने दिली. परेश याने सिंड्रेला मध्ये आर्ट डिपार्टमेंट सांभाळले होते. या क्षेत्रासंबंधित काहीच अनुभव नसताना दिग्दर्शनाच्या टीम मध्ये सामील झालेल्या स्वप्नील काळेने सुद्धा आपले मत व्यक्त केले. आयुष्य कसं जगायचं याची शिकवण देणारा सिंड्रेलाने मला माझ्या करियरची सुद्धा वाट दाखवली असे त्याने म्हंटले तर वेगवेळ््या रिअॅलिटी शो मधून पार्श्वसंगीताची धुरा सांभाळणारा व सिंड्रेलाचा संगीत दिग्दर्शक किरण वेहेले म्हणाला की, सिंड्रेला हा सिनेमा खºया अर्थाने माझ्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरला.सिनेमाच्या पडद्यामागील अनेक गोष्टींचा उलगडा दिग्दर्शक किरण नाकती यांच्या मुलाखतीद्वारे झाला. ही मुलखात संकेत देशपांडे याने घेतली. यावेळी अधिकाधिक कलाकारांना चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळावा म्हणून या सिनेमा कशा प्रकारे महत्वाचा ठरला याची उकल नाकती यांनी केली. तसेच सिनेमा घडतानाचे अनेक मजेदार किस्से त्यांनी प्रेक्षकांना रंगवून सांगितले. मुलाखतीच्या सदराअंती कट्ट्याचे कलाकार स्वप्निल काळे, प्रशांत सकपाळ, कदिर शेख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी सिनेमातील प्रमुख कलाकार राणी म्हणजेच यशस्वी वेंगुर्लेकर ही सुद्धा उपस्थित होती. सरतेशेवटी कट्ट्यावर नव्याने प्रवेश घेतलेल्या कलाकारांचे अध्यक्षांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सिंड्रेला चित्रपटाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त आठवणींना दिला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 3:58 PM
सोमवार ४ डिसेंबर रोजी ‘सिंड्रेला’ या मराठी सिनेमाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी अभिनय कट्ट्यावर खास सादरीकरणांचे आयोजन केले होते.
ठळक मुद्दे‘आठवण सिंड्रेलाची’ या सदारांतर्गत सिंड्रेलाच्या आठवणींना उजाळा ‘बस आली’ ही एकपात्री सादरनव्याने प्रवेश घेतलेल्या कलाकारांचे स्वागत