वर्तकनगर परिसरात सर्वंकष स्वच्छता अभियान; मुख्य रस्त्यांची केली स्वच्छता

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 7, 2024 04:44 PM2024-01-07T16:44:56+5:302024-01-07T16:45:36+5:30

ठाणे महापालिकेच्या वतीने सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले.

Comprehensive cleanliness drive in Vartaknagar area Cleaning of main roads | वर्तकनगर परिसरात सर्वंकष स्वच्छता अभियान; मुख्य रस्त्यांची केली स्वच्छता

वर्तकनगर परिसरात सर्वंकष स्वच्छता अभियान; मुख्य रस्त्यांची केली स्वच्छता

ठाणे: ठाणे महापालिकेच्या वतीने सर्वंकष स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच वर्तकनगर परिसरात राहणारे नागरिक सहभागी झाले. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाइपलाइन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई तसेच रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली सकाळी सहा वाजता या सर्वंकष स्वचछता अभियानास प्रारंभ करण्यात आला. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड, विमल भोईर, स्नेहा आंब्रे, आदी सहभागी झाले होते. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येऊर परिसरातील फॉरेस्ट गेट ते रिक्षा स्टँड, पाटोणापाडा, रोनाचा पाडा ते शामियाना हॉटेल, जंगल कॅम्प, एक्झोटिका हॉटेल ते पाटील बंगला, पाचगल्ली, शिवाईनगरमधील देवदया सर्कल ते राघोजी भांगरे चौक, शास्त्रीनगर, देवदयानगर, रामबाग परिसरातील उपवन इंडस्ट्रीज, टीएमटी डेपो, पायलादेवी, उपवन मैदान, कॅडबरी परिसरातील कॅडबरी सिग्नल ते माजिवडा सिग्नल हायवे, माजिवडा नाका, लक्ष्मी चिरागनगर, पोखरण रोड नं. २ येथील गांधीनगर पाण्याची टाकी परिसर, माजिवडा ते तत्त्वज्ञान विद्यापीठ, पेपर प्रॉडक्ट कंपनी, गांधीनगर, माजीवडा सर्कल मेट्रो पिलर, तुळशीधाम परिसरातील वसंत विहार, हाईड पार्क, धर्मवीरनगर, हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, जयभवानीनगर, कोकणीपाडा, टिकुजिनीवाडी, आंब्रे सर्कल, प्रेस्टीज सोसायटी, वसंतविहार, पवारनगर, नळपाडा गांधीनगर, गावंडबाग, कोकणीपाडा, भीमनगर, वर्तकनगर, समतानगर, आदी परिसरांतील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, सहायक आयुक्त तसेच विभागप्रमुख व महापालिका कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
उपवन परिसराची पाहणी
सर्वंकष स्वच्छता मोहिमेदरम्यान आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण उपवन तलावाची पाहणी केली. उपवन तलाव येथे सुरू असलेले सुशोभीकरण, विसर्जन घाट तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करत असताना सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 

Web Title: Comprehensive cleanliness drive in Vartaknagar area Cleaning of main roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे