भिवंडीत एमआयएमच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 06:44 PM2020-12-27T18:44:02+5:302020-12-27T18:44:17+5:30
या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी व पत्रकार परिषदे दरम्यान एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे कोरोना संकटातील सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला.
नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी महापालिका निवडणूक अवघ्या एक दिड वर्षांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी शहरात आप आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी व्युव्ह रचना अखण्यास सुरुवात केली आहे.
भिवंडीत एमआयएम पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व राजकीय मोर्चे बांधणी करण्यासाठी एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांनी रविवारी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. या साठी मार्गदर्शन शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी पत्रकारांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू हे खंडणी प्रकरणात मागील तीन चार महिन्यांपासून अटक असल्याने आगामी काळात एमआयएम पक्षाच्या शहराध्यक्षाची धुरा नेमकी कोण सांभाळणार अथवा कुणाकडे सोपविणार असा प्रश्न पत्रकारांनी एमआयएमच्या प्रदेश कार्यध्यक्षांना विचारताच या पत्रकारपरिषदे प्रसंगी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.
हा गोंधळ एवढा वाढला की पुढे पत्रकारांनी एमआयएमच्या पत्रकार परिषदेचाच त्याग केला. या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी व पत्रकार परिषदे दरम्यान एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे कोरोना संकटातील सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला.