ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण ८० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:02 AM2020-07-28T06:02:27+5:302020-07-28T06:02:39+5:30

१४७४ नवे रुग्ण तर ३६ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

Corona patients cross 80,000 in Thane district | ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण ८० हजार पार

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण ८० हजार पार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ४७४ नव्या रुग्णांची सोमवारी वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ८० हजार ४१ झाली आहे. याशिवाय ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या दोन हजार १८९ झाली आहे.
सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवे २२६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात १७ हजार ९५८ रुग्णसंख्या झाली. तर तिघांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा ५९९ झाला आहे. सोमवारी ५०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. समाधानाची बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्के झाले आहे. यानुसार १२ हजार ८७ जण बरे झाले आहेत.
नवी मुंबईत ३१४ नव्या रुग्णांची सोमवारी भर पडली असून सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या १३ हजार ९३२ झाली असून मृतांची संख्या ३९४ वर पोहचली आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये नवे १०६ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या पाच हजार ६५३ तर मृतांची २५६ झाली आहे. उल्हासनगरमध्ये कोरोनामुळे सोमवारी चौघांचा मृत्यू झाला. तर नवे ९३ रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता मृतांची संख्या ११६ झाली. समाधानाची बाब म्हणजे सोमवारी १९६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ५३८ तर मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या चार हजार ६३९ झाली आहे. उपचार घेणारे अ‍ॅक्टिव रुग्ण एक हजार ७८३ रुग्ण आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात सोमवारी ५१ बाधित आढळले. तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे मृतांची संख्या १९० वर पोहोचली आहे. बाधितांची संख्या तीन हजार ५०५ झाली आहे. अंबरनाथमध्ये ७७ रुग्णांची तर, एका मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५८८ झाली. तर मृतांची १४० वर गेली आहे. बदलापूरमध्ये नवे ५२ रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३६० झाली. या शहरात सोमवारी सहा जण दगावल्याल्यामुळे ४१ मृत्यूची सोमवारपर्यंत नोंद झाली आहे.
ठाणे ग्रामीण भागात २२५ नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ६५३ तर मृतांची संख्या १३७ वर गेली आहे.


वसई-विरारमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू
वसई : वसई-विरार महापालिका परिसरामध्ये सोमवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी दिवसभरात १८३ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ३७३ वर पोहोचली आहे. दरम्यान, १२२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वसई दोन, नालासोपारा एक आणि विरारमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर पालिका हद्दीत एकूण २३२ रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर दिवसभरात १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये वसई-४५, नायगाव-६, वसई-विरार-१०, नालासोपारा-५८ आणि विरार-६४ रुग्णांचा समावेश आहे. यात एकूण ११३ पुरुष तर ७० महिला बाधित ठरल्या आहेत. दरम्यान, शहरात १२२ रुग्ण घरी परतले असून आजवर मुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ४०८ वर पोहोचली आहे. त्यासोबत शहरात एकूण ३ हजार ७३३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

Web Title: Corona patients cross 80,000 in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.